शालेय शिक्षणात गणिताला महत्वाचे स्थान आहे. शालेयस्तरावर दहावी पर्यंत गणित हा अनिवार्य विषय आहे. या शालेय जीवनात गणिताची गोडी विकसित झाली तर गणित हा आयुष्यभर आवडीचा विषय बनतो. याकरिता विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी गणित विषयाची गोडी वाढवण्यासाठी गणितमित्र या संकल्पनेची फेब्रुवारी २०१९ पासून सुरवात केली आहे.
गणितीय संबोध, संकल्पना, उपक्रम, कृती, विशेष लेखन, कोडी यासारखी गणितमय प्रवासात गणितमित्रासोबत सदैव रहा.
गणित म्हणजे काय? आपल्या पाल्याला, विद्यार्थ्याला, स्वतः आपल्याला गणिताची अभिरुची कशी वाढवावी? याकरिता गणितमित्र कार्यरत आहे.
- सहज सोपे सुलभ गणित
- अमूर्त समजले जाणारे गणित मूर्त स्वरूपात बघण्याचा दृष्टिकोन विकसित करणारे गणित
- गणितातील विविध घटकांवर आधारित विद्यार्थ्यासोबत कृती असणारा व्हिडीओ
- गणित साहित्याचे उपयोजन गणित विषयक विविध लेख, उपक्रम
- स्पर्धा परीक्षेतील विचार करणारे प्रश्न
- सर्व पालक, शिक्षक व विद्यार्थी यांना गणित विषयाची गोडी वाढविणे.
गणितातील महत्वाची माहिती
गणित हा विषय खूपच महत्वाचा आहे. त्यातील सौदर्यस्थळे मुलांना दाखवल्यास त्यांना या विषयाची गोडी आपोआप वाढत जाते.
भारतीय गणिततज्ञ
भारतीय गणिततज्ञांचा जीवन प्रवास जाणून घेऊया.
गणिताची प्रयोगशाळा कशी असते हे जाणून घेवूया.
गणिती कोड्यांच्या माध्यमातून दैनदिन जीवनातील गणिताचा संबंध जाणून घेवूया.
व्हिडीओ, ऑनलाईन चाचणीच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करा.
गणित संबोध
साध्या सोप्या कृतीतून गणिती संबोध समजून घेवूया.
गणित सूत्रे
गणितातील विविध घटकातील सूत्रे, व्याख्या जाणून घेवूया.
NMMS EXAM
NMMS परीक्षा म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा
NMMS Exam परीक्षा स्वरुप
NMMS परीक्षेसाठी दोन पेपर असतात.
१) SAT - शालेय क्षमता चाचणी
२) MAT - मानसिक क्षमता चाचणी