Title of the document
top of page

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा- इयत्ता आठवी  

               राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाने सन १९५४-५५ या शैक्षणिक वर्षापासून सुरु केली आहे. यातील एक महत्वाचा भाग म्हणजे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा- इयत्ता आठवी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत होणारी  शिष्यवृत्ती परीक्षा हि प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असते.  या परीक्षेची तयारी करण्यासाठी आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत. हि सर्व सुविधा विनामुल्य/निशुल्क/ मोफत असणार आहे. आम्हाला फक्त आपल्याकडून दोन बाबींची अपेक्षा आहे. 

         १) आपण नियमित सर्व सत्रांना उपस्थित राहून अभ्यास करणे.

         २) वेळोवेळी होणाऱ्या सराव चाचण्या सोडविणे.

         

चला तर मग करूया सुरवात !

 

​           आपले ऑनलाईन सत्र दिनांक १ सप्टेंबर २०२१ पासून सुरु होणार आहे. आपल्याला दर पंधरा दिवसाच्या वर्गांचे वेळापत्रक, ऑनलाईन सत्राची लिंक, महत्वाचे लेख, मागील सत्रांचे व्हिडिओ, सराव प्रश्नसंच याच वेबपेजवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल...

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) अभ्यासक्रम  व स्वरूप 

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) - मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका  पेपर १   सदर परीक्षेतील चार संचापैकी संच A ची प्रश्नपत्रिका..( सर्व संचात समान प्रश्न असतात फक्त क्र. वेगळे असतात.)

परीक्षेला जाण्यापूर्वी जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप महत्वाचे आहे.

    •  प्रश्नपत्रिका सोडवण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज येईल.

    • वेळेचे योग्य नियोजन करता येईल.

    • विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढतो.

    • प्रश्नपत्रिकेचे व प्रश्नांचे स्वरूप लक्षात येते.

    • प्रश्नाची काठीण्यपातळी लक्षात येते.

    • दीड तास सलग बसून प्रश्न सोडवण्याची सवय होते.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) - मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका  पेपर २        सदर परीक्षेतील चार संचापैकी संच A ची प्रश्नपत्रिका.( सर्व संचात समान प्रश्न असतात फक्त क्र. वेगळे असतात.)

शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय प्रवेश पूर्व परीक्षा - माहिती व स्वरूप #Ganitmitra
01:16:30
bottom of page