Title of the document
top of page

आर्यभट्ट (प्रथम)  :-

भारताचे सर्वात पहिले गणितज्ज्ञ म्हणून आर्यभटट् यांना ओळखलं जातं. आर्यभट्ट यांचा अंकगणित, बीजगणित व भूमिती या गणिताच्या शाखांचा त्याचा सखोल अभ्यास होता. वयाच्या तेविसाव्या वर्षीच त्याने बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला. म्हणून आर्यभट्ट यास बीजगणिताचा जनक असे मानण्यात येते. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. जगाला शून्याची ओळख करून गणित शास्त्रात महत्वाची कामगिरी केली. 

तर आज आपण या महान व्यक्तिमत्वाविषयी माहिती पाहणार आहोत, आपल्याला सर्व   माहिती आवडेल अशी आशा ठेवतो. तर चला अश्या एका महान खगोलशास्त्री आणि गणितज्ञ यांच्या जीवनावर थोडासा प्रकाश टाकू.

​जीवनचरित्र 

              भारतीय गणित परंपरेतील प्रथम सहस्रकातील पहिले उल्लेखनीय गणितज्ञ. आर्यभट यांना अश्मकाचार्य या नावानेही ओळखले जाते.यांच्या जन्मस्थानाबद्दल निश्चित पुरावा नाही परंतु त्यांनी आपल्या आर्यभटीय किंवा आर्यसिद्धांत या ग्रंथात कुसुमपुरा येथे ज्ञान प्राप्त केल्याचा उल्लेख केला आहे. कुसुमपुरा म्हणजेच पाटलीपुत्र व पुढे यालाच पाटणा असे म्हणतात. त्यांचे अध्ययन आताच्या बिहार राज्यातील पाटणा शहराच्या परिसरात झाले असावे असा अंदाज आहे. कलियुगाची ३,६०० वर्षे संपली तेव्हा आपले वय २३ वर्षांचे होते असेही त्यांनी या ग्रंथात म्हटले आहे. यावरून त्यांचे जन्म वर्ष इ. स. ४७६ असावे असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. मात्र त्यांच्या मृत्यूसंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नाही. 

                  आर्यभटीय किंवा आर्यसिद्धांत या ग्रंथात  या ग्रंथात वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांचे गुणोत्तर आर्यभटांनी  मांडले आहे. ज्याचा अर्थ असा की, ज्या वर्तुळाचा व्यास २०,००० (अयुतद्वय) असेल त्या वर्तुळाचा परिघ जवळजवळ {(१०० + ४) × ८ + ६२,०००} = ६२,८३२ असतो. यावरून परीघ आणि व्यास यांचे गुणोत्तर (‘पाय’, π) ३.१४१६ येते. ‘पाय’ चीही किंमत पाचव्या शतकापर्यंतची सर्वोत्तम किंमत मानली जाते. विशेष म्हणजे ही किंमत ‘आसन्न’,  म्हणजेच अंदाजे, जवळची असल्याचे त्यांनी स्वत; नमूद केले आहे. आर्यभट्ट यांनी आर्किमिडीज़ पेक्षाही अचूक अशी “पाय” ची किमंत सांगितली होती, ती अशी होती ३.१४१६.

                आर्यभट्ट यांनी पाचव्या शतकात पृथ्वी गोल आहे, हा सिद्धांत मांडला.   जगाला मध्ययुगातील खगोलशास्त्री निकोलस कॉपरनिकस ने सांगितले की, पृथ्वी गोल आहे,  पण निकोलस  यांच्या १ हजार वर्ष अगोदर आर्यभट्ट यांनी आपल्या ग्रंथात सांगितले की,  पृथ्वी गोल आहे. यासोबतच  तिचे आकारमान सुद्धा सांगितले होते, तर आपण विचार करू शकता कि आर्यभट्ट यांनी त्या काळात किती मौलिक गोष्टीचे संशोधन केले होते. तेव्हाच्या काळात आणखी त्यांनी निर्माण केलेल्या एका सूत्रावरून, एका वर्षातील दिवसांची संख्या  ३६५.२९५१ असतात असे सांगितले होते. त्यांना खागोलशास्त्रात आणि गणितामध्ये एक विशेष आवड होती, त्यांनी गणितामध्ये बरेचसे सूत्र शोधून काढले आहेत. 

                 

                  इ.स. ४९९ च्या सुमारास रचलेला आर्यभटीय हा गणित व खगोलशास्त्रावरील विवेचनात्मक ग्रंथ या विषयांवरील प्राचीनतम भारतीय साहित्यकृतींमधील एक मानला जातो. वराहमिहिराच्या साहित्यातील संदर्भांनुसार त्यानी आर्यसिद्धान्त नावाचा अन्य एक ग्रंथही रचला. त्याचे भाग (१) गीतिका पाद, (२) गणितपाद,(३) कालक्रियापाद, (४) गोलपाद. मात्र वर्तमानकाळात त्या ग्रंथाची एकही संहिता उपलब्ध नाही असे दिसून येते. अंकगणित, बीजगणित व भूमिती या गणिताच्या शाखांचा त्याचा सखोल अभ्यास होता. आज बीजगणितावरचा उपलब्ध जुना ग्रंथ विख्यात ज्योतिर्वेत्ता आर्यभट्ट याचा आहे. व वयाच्या तेविसाव्या वर्षीच त्याने बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला. म्हणून आर्यभट्ट यास बीजगणिताचा जनक असे मानण्यात येते.
             आर्यभटानी  ० अंशापासून ते ९० अंशापर्यंत ३/१११ अंशाच्या फरकाने सर्व कोन घेऊन त्यांचे ज्यार्ध कसे काढावेत हे सांगितलेले आहे. तसेच पृथ्वी स्वतःभोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारे पहिला शास्त्रज्ञ होय. वर्षाचे दिवस ३६५, घटी १५, पळे ३९, विपळे १५ इतक्या सूक्ष्म भागांपर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे. तसेच 'पाय' नावाची गणित संकल्पनेची किंमत ६३,८३२/२०,००० आहे असेही नोंदवले आहे सूर्य सिद्धान्तावर याने लिहिलेला एक टीका ग्रंथ 'सूर्य सिद्धान्त-प्रकाश ' या नावाने प्रसिद्ध आहे.
                  आर्यभट्ट यांना ग्रहणाची शास्त्रीय कारणमीमांसा ज्ञात होती. अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेस चंद्रग्रहण यांचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे, हे त्यांना माहीत होते. तसे त्यांनी नोंदवून ठेवले आहे.  सूत्रांचा उपयोग खगोलशास्त्र विषयक ग्रंथांत मोठ्या प्रमाणावर केला. अशा ग्रंथांत आकडेमोड द्यावी लागते परंतु मजकूर तर मुख्यत्वे काव्यमय व यमकात असतो. मग संख्या पद्यात बसवण्यासाठी त्या अक्षराने निर्दिष्ट करायच्या व ती अक्षरे वृत्तात बसवून श्लोकात लिहावयाची असा मार्ग आर्यभट्टानी अवलंबला. त्यामुळे अक्षरसंख्या कमी होते, शिवाय वृत्तबद्ध लिखाण होते. त्यावेळी लेखनाची साधने उपलब्ध नसल्याने त्या संख्या अशा प्रकारे लक्षात ठेवणेही सो
पे जात असे.ख्या लक्षात राहण्यासाठी एक रामबाण उपाय म्हणजे कटपयादि सूत्रे. कटपयादि सूत्र म्हणजे एखादा अंक एखाद्या अक्षराने दाखवणे. जसे --
                                   

                                                वर्गाक्षराणि वर्गेऽ वर्गेऽ वर्गाक्षराणि कात्‌ ङ मौ यः । खद्विनवके स्वरा नववर्गेऽ वर्गे नवान्त्यवर्गे वा ॥

                 

             या सूर्यमालेत सूर्य स्थित आणि स्थिर आहे हे जगाला सर्वप्रथम सांगणारे आर्यभट्ट होते. पृथ्वी एका जागी वसलेली नाही. ते सूर्याभोवती फिरत आहे. तो स्वतःच्या अक्षावरही फिरत असतो. हे सर्व प्रथम आर्यभट्ट ऋषींनी सर्व जगाला सांगितले. आर्यभटीयात एकूण 108 श्लोक आहेत. जे चार प्रमुख अध्यायांमध्ये विभागलेले आहे. त्यांच्या प्रत्येक श्लोकात खूप खोली दडलेली आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये विशिष्ट विषयाचा समावेश करण्यात आला आहे.

          1. गीतिकापद : -
                       यात 13 श्लोक आहेत. यात वेळेच्या मोठ्या युनिट्सचे वर्णन केले आहे. ज्याची त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगात पूर्ण व्याख्या आहे. त्यात त्यांनी      ब्लॅक होलचे पूर्ण वर्णन केले आहे. आपले आधुनिक विज्ञान पूर्णपणे यावर आधारित आहे.

        \

           2. गणिताचे श्लोक :
                     एकूण 33 श्लोक आहेत ज्यात मुख्य गणिते नमूद केली आहेत. ज्यामध्ये simple आणि quadratic equation, simultaneous और indeterminate equations चा तपशीलवार उल्लेख आढळतो. अंकगणित, अंकगणित प्रगती (Arithmetic Progression (AP)), भूमितीय प्रगती (Geometric Progression (GP)) आणि AP ची बेरीज (sum of AP), GP ची बेरीज (Sum of GP) स्पष्ट केली आहे. यासोबतच वर्गमूळ (Square root), घनमूळ (Cube), सोप्या भाषेत समांतर मालिका अशी अनेक समीकरणे. हे या पुस्तकात स्पष्ट केले आहे.

           3. कालक्रिया पद :- 
                     यात 25 श्लोक आहेत. हे वेळेच्या वेगवेगळ्या युनिट्सचे वर्णन करते. यासोबतच ग्रहांच्या स्थितीचे वर्णनही उपलब्ध आहे. आपल्या पृथ्वीच्या revolutions आणि rotation योग्यरित्या मोजले गेले आहेत. ग्रहण बद्दल सांगितले आहे. याच्या आधारे पंचांग तयार करण्यात आले. ज्याचा उपयोग शुभ आणि अशुभ कार्य करण्यासाठी होतो.

          4. गोल पद :- 
                     यात 50 श्लोक आहेत. यामध्ये त्रिकोणमिती (Trigonometry) आणि भूमितीचा (geometry) तपशीलवार उल्लेख केला आहे. पृथ्वीच्या आकारामुळे, दिवस आणि रात्र, खगोलीय गोलाचे पैलू, खगोलीय विषुववृत्ताबद्दल सांगितले जाते. या वर्णनात वेगवेगळ्या राशीच्या चिन्हे (Zodiacal signs) आढळतात. ज्योतिषशास्त्राचे सविस्तर वर्णनही उपलब्ध आहे.

  प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ वराहमिहिर हे त्यांचे शिष्य होते. त्यांच्या पाठोपाठ आर्यभट्ट दुसरा इसवी सन 875 मध्ये आले. त्यांना लघू आर्यभट्ट म्हणूनही ओळखले जात असे. जे ज्योतिष आणि गणितात पारंगत होते आणि त्या काळातील प्रसिद्ध शिक्षक होते. आर्यभट्ट द्वितीयने नंतर ज्योतिषशास्त्रावर महासिद्धांत नावाचा ग्रंथ लिहिला.

 

          आर्यभट्ट यांचे बहुतांश साहित्य नालंदा विद्यापीठात संग्रही होते. परंतु सामाजिक व राजकीय लालसेपोटी नालंदा विश्वविद्यालयाला जाळण्यात आले होते.  तेव्हा तेथील काही महत्वाची ग्रंथे जाळल्या गेली होती, त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातील बरेचश्या गोष्टी आज नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले काही नवीन प्रयोग आपल्यापर्यंत पोहचले नाहीत.

           आर्यभट्ट यांचे निधन इसवी सन ५५० च्या जवळपास झाल्याचे इतिहासात दिसून येते.

         १५ एप्रिल १९७५ साली भारताने  सोडण्यात आलेल्या पहिल्या उपग्रहाला आर्यभट्ट यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त “आर्यभट्ट” यांचे नाव देण्यात आले. भारतीय अवकाश संशोधन करणारी संस्था इस्रो ने २००९ मध्ये पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये शोधलेल्या तीन जिवाणूंपैकी एका जीवाणुला “बॅसिलस आर्यभट’ असे नाव दिले. आंतरराष्ट्रीय खगोलीय संस्थेने चंद्रावरील एका छिद्राला ‘आर्यभट्ट’ असे नाव दिले आहे.

तर ही होती भारताच्या महान एका गणितज्ञ तसेच खगोलीय वैज्ञानिक आर्यभट्ट यांच्या विषयी थोडक्यात माहिती.

अभिमानाने सांगा की, आम्ही अशा भारतीय पूर्वजांचे वंशज आहोत, ज्यांनी अशा मौलिक बाबींची माहिती जगाला दिली. तर आशा करतो आपल्याला वरील सर्व माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन माहितीसाठी रहा गणितमित्रा सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

bottom of page