Chika Ofili-
चिका ओफिली
चिका ओफीली या 12 वर्षाच्या United Kingdom मध्ये राहणाऱ्या नायजेरीयाच्या विद्यार्थ्याने एखाद्या संख्येला 7 ने भाग जातो किंवा नाही याचे सूत्र शोधून काढले आहे. या बद्दल त्याला UK चे True Little Hero awards प्राप्त झाले आहे. ‘True Little Hero awards' हा वार्षिक समारंभ आहे, ज्यात संपूर्ण यूकेमध्ये 17 वर्षांखालील मुलांना उल्लेखनीय काम करण्याबद्दल पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराच्या 2019 च्या आवृत्तीत ओफिली यास 7 च्या विभाज्यतेच्या कसोटीचे सूत्र शोधण्यासाठी पुरस्कार मिळाला. वेस्टमिन्स्टर अंडर स्कूलमध्ये गणिताची विभागप्रमुख असलेल्या चिकाची गणिताची शिक्षिका मेरी एलिस यांनी सांगितले की, सुट्टीतील असाइनमेंट सोडवताना त्याला हे नवीन सूत्र सापडले.
त्यांनी सर्वांना एक पुस्तक दिले होते, ज्यात 2 ते 9 क्रमांकाद्वारे एखादी आकृती अगदी विभाजित करण्यायोग्य असेल तर पटकन कार्य करण्यासाठी अनेक विभाज्यातेच्या कसोट्यांचा वापर केला गेला होता, परंतु 7 संख्येच्या विभाजन तपासण्याकरिता या पुस्तकात कोणतीही कसोटी नव्हती.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मास्टर चिका ओफिलीचे अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
पध्दत.....
546 ला 7 ने भाग जातो किंवा नाही?
546 यातील एकक स्थानाला 5 ने गुणणे
6×5=30 .............हा गुणाकार उर्वरित संख्येत मिळवणे
54+30=84
84 ला 7 ने भाग जातो म्हणून 546 ही 7 ने भाग जाणार.
दुसरे उदा. 3437
7×5=35
343+35=378
8×5=40
37+40=77
77 ला 7 ने भाग जातो म्हणून 3437 ला 7 ने भाग जाणार....