गणित प्रयोगशाळा :-
पुष्कळशा विद्यार्थ्यांना गणित म्हणजे एकतर चुक किंवा बरोबर असे वाटते . जेव्हा त्यांचे उत्तर चुकते तेव्हा त्यांना स्वतःला काही येत नाही असे वाटते . त्यामुळे त्यांची अध्ययनाची रूची कमी होते . दुसऱ्या बाजूला काही विद्यार्थी असेही असतात की ते परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी गणिताचे सूत्र, क्रिया, नियम पाठांतर करतांना दिसतात. जेव्हा शिक्षक गणित वेगळ्या पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्याकडे गणितीय अध्ययन अनुभव, खेळ, उपक्रम आणि कृती व्यतिरीक्त दुसरे मार्ग उपलब्ध नसतात . या कृती आणि खेळ हे अध्ययनाची प्रक्रिया अधिक रूचीपूर्ण आणि परिणामकारक करतात . यासाठी गणित प्रयोगशाळेची रचना महत्वाची ठरते.
गणित प्रयोगशाळा हे एक असे ठिकाण आहे की जेथे आपणास खेळ, कोडी, शैक्षणिक साधने आणि इतर साहित्ये इत्यादींचा गणिती कृती करण्यासाठी संग्रह केलेला आढळतो. ही सर्व साहित्ये विद्यार्थ्यांनी व्यक्तीशः हाताळण्यासाठी किंवा शिक्षकांनी
हाताळण्यासाठी असतात जेणे करून गणित जगाचा शोध करता येईल आणि गणितात रुची निर्माण करता येईल. जरी गणित ही शाखा भौतिक, रसायन किंवा जीव इत्यादींसारखी प्रयोगात्मक शास्र नसले तरीही गणित प्रयोगशाळा गणिती संकल्पना आणि कौशल्ये समजण्यासाठी योगदान करतात.
● कृतीतून अध्ययन यासाठी गणित प्रयोगशाळा संधी उपलब्ध करून देतात. यात खूपशा मूर्त कृती अशा असतात की त्या विद्यार्थांना अमूर्त विचारसरणीचा पाया तयार करतात.
◆ वैयक्तीक सहभागास या कृती खूप वाव निर्माण करून देतात. तसेच विद्यार्थ्यांना स्वतंत्र अध्यायनासाठी प्रवृत्त करतात आणि विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यासाठी उद्युक्त करतात.
● गणित प्रयोगशाळेतील कृती या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात आणि विषय व संकल्पनेमध्ये योग्य दुवा साधून गणितातील योग्य क्षेत्रांचे अध्ययन करण्यास पायाभूत ठरतात.
◆विविध खेळ आणि कोडी, मोकळीका यांमध्ये विद्यार्थी नियमांचा वापर करण्यास शिकतात आणि या नियमांत बदल करण्याची संधीही त्यांना येथे मिळते. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना गणिती प्रश्नांमध्ये नियम आणि बंधने यांच्या भूमिकेची जाणिव होते.
● प्रत्येक कृतीसाठी व्यक्तीशः वेगळा वेळ देणे शक्य असते आणि एक कृती कितीही वेळा करण्याची मुभा असते. त्यामुळे विद्यार्थी त्या कृतीची पूनः पून्हा उजळणी करू शकतात . त्यावर विचार करू शकतात आणि प्रश्नाची उकल पाहू शकतात. यामुळे उच्च बोधात्मक क्षमता विकसित होते.
● या कृतींमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि कृतीपूर्ण अध्यापनामुळे रूचीही वाढीस लागते.
◆ महत्त्वाचे म्हणजे शालेय गणित अध्ययनात या कृतींमूळे विविधता आणता येते.
गणिताच्या प्रयोगशाळेत कोणकोणती साधने असावीत? त्यानुरूप काही साहित्यांची यादी केली आहे.
साहित्य यादी तयार करतांना काही निकष डोळ्यासमोर ठेवावीत.
1) साहित्य हाताळण्यायोग्य असेल.
2) साहित्य प्रमाणशीर व शास्त्रशुद्ध असावे.
3) काही अध्ययन अनुभवांसाठी अप्रामाणिक साहित्याचा वापर करावा लागतो, अशा स्वरूपाचे साहित्य असावे.
साहित्य यादी:-
1) मणी माळ- दशकमाळ , एककमाळ
2) स्थानिक किमतीचा संच
3) धूळ पाटी
4) जोडो ब्लॉक
5) भौमितिक आकार( लाकडी, फोम, पुठ्याचा वापर करून द्विमितीय/त्रिमितीय)
6) डॉट ग्रीड पेपर, चौकट वही, आलेख पेपर
7) चौरस, आयताकृती लाकडी ठोकळे
8) मीटर पट्टी, फूट पट्टी, 1ते 20 संख्या पट्टी
9) Tangram
10) नाणी नोटा
11) वेगवेगळ्या धारकतेचे माप
12) वजने/ वजनकाटा/ तराजू
13) घड्याळ/ दिनदर्शिका
14) स्ट्रॉ
15) आईस्क्रीमच्या काड्या, रबर
16) परिसरातील सहज उपलब्ध साहित्य (दीर्घकाळ टिकणारे) - चिंचोके, मणी, गोट्या,दोरा इ.
17) कंपसपेटीतील साहित्य:- कंपास, कर्कटक, कोनमापक, पेन्सिल
18) अपूर्णांक संच ( लाकडी/फोम/कार्डशिटचा चा वापर करून) पाव, अर्धा, पाऊण, एक, दीड, पावणेदोन, एक अष्टमांश, एक शष्टमांश
19) डायस
20) abacus पाटी
21) तापमापी
22) अंक कार्ड/ संख्या कार्ड (आवश्यकतेनुरूप)
23) जिओ बोर्ड
यात आपण अजून विविध गणितीय साहित्य जोडू शकता.