गणनपूर्व तयारी
विद्यार्थ्याला औपचारीक गणिताकडे नेताना त्याच्या भावविश्वाशी निगडीत तसेच गणितातील प्राथमिक स्तरावरील सात क्षेत्रांच्या पूर्वतयारीशी निगडित काही अनौपचारिक/ औपचारिक क्रियां/संबोधाची जोड द्यावी लागते. या घटकात प्रामुख्याने लहान-मोठा, मागे-पुढे, वर-खाली, एक-अनेक, फरक ओळखा, कमी-जास्त, लांब-आखुड, उंच-ठेंगणा, आत-बाहेर, रुंद-अरुंद, जड-हलका, डावा-उजवा, फरक ओळख यासारख्या घटकांचा इयत्ता पहिली मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
प्रथमदर्शनी हे सर्व घटक आपल्या वयोमानानुसार तसेच बौद्धिक प्रगल्भतेमुळे कदाचित आपणास खूप लहान वाटत असतील परंतु इयत्ता पहिली मध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना या घटकांचे महत्त्व खूप मोलाचे आहे. या घटकांना बऱ्याचदा दुर्लक्षित ठेवले जाते. आजही लांब-आखूड, रुंद-अरुंद यातील फरक बऱ्याच व्यक्ती/शिक्षक यांना प्रथमतः गैरसमज निर्माण होतो.घरगळणे व घसरणे या बाबतीतल्या घटकांमध्ये आजही प्रथमता दुमत निर्माण होते कारण यातील संबोध व पूर्व धारणा यातील गैरसमज...
या घटकातील प्रत्येक संबोध विद्यार्थ्याला अवगत झाल्यावर विद्यार्थी पुढे गणिताच्या विविध क्रियांमध्ये या संबंधांचा अचूक वापर करतो. याकरिता मुलं या वरील संबोध ग्रहणासाठी आवश्यक ते पूर्वज्ञान शिकलेला असतो.फक्त आपण प्रत्येक संबोध समजण्यासाठी अध्ययन अनुभव, कृतींचा सराव महत्वाचा आहे. सदर घटकांचे अध्ययन होण्यासाठी पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊन विविध अध्ययन अनुभवांची निर्मिती करता येईल. विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांचा सराव घेता येईल. गणितातील प्रत्येक छोट्या छोट्या घटकांच्या/ संबोधाच्या जोडणीने उद्याच्या गणिततज्ञाचा पाया भरला जातो.