Title of the document
top of page

संख्याचे मुलभूत प्रकार:-

अश्मयुगापासून ते आत्तापर्यंत संख्याप्रणालीचा विकास होत गेला त्यातील संख्याचे मूलभूत प्रकार कोणते आहेत हे पाहूया.

     

      1) नैसर्गिक संख्या( मोज संख्या) :- निसर्गातील वस्तू , पदार्थ, बाबी इ. मोजण्यासाठी वापरात येणाऱ्या संख्या. यातील कोणतीही बाब मोजतांना ही एकापासून सुरवात होते, यात पाव, अर्धा,  पाऊण नसतो, म्हणून लहानात लहान संख्या- 1 व मोठ्यात मोठी संख्या सांगता येणार नाही
     
2) पूर्ण संख्या:- नैसर्गिक संख्याचा वापर करत असतांना 0 चा अभाव होता, त्यामुळे 0 चा समावेश असणाऱ्या संख्या संचाला पूर्ण संख्या असे संबोधतात.  म्हणून लहानात लहान संख्या  0 व मोठ्यात मोठी संख्या  सांगता येणार नाही. यामध्ये फक्त 0 व धन  संख्यांचा समावेश असतो.
     
३) पूर्णांक संख्या:-   0 ते अनंत या संख्या सोबत  ऋण संख्याचा समावेश असणाऱ्या संख्या संच म्हणजे पूर्णांक संख्या . यामध्ये ...-2,-1,0,1,2....म्हणून लहानात लहान संख्या व मोठ्यात मोठी संख्या दोन्हीही सांगता येणार नाही.

     4) परिमेय संख्या:- यामध्ये ज्या संख्याच्या छेदस्थानी 0 व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व संख्या -2,-3/2,-1,-1/2,0,1/2,1,3/2,2

एखादा पूर्णांक अ आणि एखादा शून्येतर पूर्णांक ब यांच्यातल्या अ/ब अशा गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना उद्देशून वापरली जाणारी संज्ञा होय. परिमेय संख्यांच्या या गुणोत्तर स्वरूपातील विशेष बाब ही, की त्याच्या छेदातील ब हा पूर्णांक कदापि शून्य नसतो. अर्थात ब पूर्णांकाचे मूल्य १ असू शकते; शून्यास कोणत्याही पूर्ण संख्येने भागले असता उत्तर शून्यच येते; त्यामुळे शून्यासही परिमेय संख्यांत गणले जाते.  

      5) अपरिमेय संख्या:-  ज्या संख्या भौमितिक प्रतलावर अचूक मांडता येत नाहीत, त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. या संख्या अंश भागिले छेद अशा लिहिता येत नाहीत, किंवा दशांश पद्धतीत लिहिल्या असता त्यांतील आकड्यांचा क्रम कोणताही नियम पाळत नाही.

उदाः π,√२,√३ वगैरे.

π = ३.१४१५९ २६५३५ ८९७९३ २३८४६ २६४३३ ८३२७९ ५०२८८ ४१९७१ ६९३९९ ३७५१० ५८२०९ ७४९४४ ५९२३० ७८१६४ ०६२८६ २०८९९ ८६२८० ३४८२५ ३४२११ ७०६७९ ८२१४८ ०८६५१ ......

      6) वास्तव संख्या:- परिमेय व अपरिमेय संख्याच्या एकत्रित संचास वास्तव संख्या म्हणतात .सम, विषम,मूळ,सयुंक्त,त्रिकोणी,चौकोनी  यासारखे विविध संख्याच्या विशिष्ट गुणधर्मावरून वर्गीकरण केले जाते. सम, विषम,मूळ,सयुंक्त,त्रिकोणी,चौकोनी यासारखे फक्त नैसर्गिक संख्याचे वर्गीकरण असते.
 

804-8041013_paper-pencil-stationery-cart

गणितमित्र- वैभव शिंदे

 - मो.नं. - ९५५२७७४३८५

- vsshinde3569@gmail.com

bottom of page