Title of the document
top of page

प्रथम ऑनलाईन वर्ग - २ एप्रिल २०२० ते १४ एप्रिल २०२० 

श्री विघ्ने अंबादास कुशाबा,   (प्राथमिक शिक्षक)

 जि.प.प्रा.शाळा आनंदवाडी,  ता.भोकरदन, जि. जालना.

-         -----  लॉकडाऊन काळात गणिताशी नाळ जोडणारे LEARNING FROM HOME चे 14 दिवस... 

         🎯सर्वप्रथम गणितमित्र   श्रीमान वैभव सर, श्रीमान वाल्मिक सर   याना मी धन्यवाद देईन. 🙏🙏🙏

               शब्दांकन करतांना खूप आनंद होतोय की, आम्ही भाग्यवान विजेते आहोत. गणितमित्र टीम सोबत आपण जोडले गेलो. खरं सांगायच तर कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊनचा आदेश जारी झाला. घराबाहेर पडणे बंद झाले. एकसारख घरात बसून २-३ दिवसातच कंटाळा आला, कारण सवय नाही ना. माझ्या मोबाईल मध्ये गणितमित्र या नावाने वैभव सरांचा contact नंबर save होता. सरांचा दररोज गणितविषयीचा एक प्रश्न whats app वर यायचा. आम्हीही आमच्या परीने प्रतिसाद द्यायचो. 28 मार्च ला सरांची   LEARNING FROM HOME   (Online workshop) संदर्भातील पोस्ट आणि लिंक अली. त्यामध्ये नोंदणी दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत होती. माझ्याकडून नोंदणी करायची राहून गेले. 1 एप्रिलला सरांसोबत whats app वर जो संवाद झाला तो असा...

           : सर माझे registration राहून गेले,  आता add होता येईल का?  मी विनंती केली.

( सरांनी नाव, तालुका, जिल्हा कोणता?, शिक्षक/विद्यार्थी/पालक यापैकी कोण असे विचारले.)

सरांनी सांगितले- खरं तर, आत्ता जवळपास 1700 फॉर्म मधून 200 व्यक्तीची निवड केली आहे,, त्यातही 50 निवड करायची आहे.

पण माझी विनंती पाहून, सरांनी मला दुसरी लिंक पाठवून लिंक भरायला सांगितली. तिथेच मला सरांच्या स्वभावाची प्रचिती अली.  मी विलंब न करता तात्काळ लिंक भरली. दुसऱ्या दिवशी पूर्वाचाचणीची लिंक प्राप्त झाली. चाचणीही सोडवली. वाटले 1700 व्यक्ती मधूनआपली निवड काही पहिल्या बॅच मध्ये होणार नाही. योगायोगाने पहिल्या बॅच साठी निवडही झाली. म्हणून भाग्यवान विजेते झाल्यासारखे वाटले.

 

आणि दि. 2 एप्रिल 2020 पासून हा 14 दिवसाचा गणिताचा प्रवास सुरु झाला.

  Learning from home या माध्यमातून प्रत्येक दिवसाच्या सत्रातून वैभव सरांनी आमच्या झोळीत भरभरून माप टाकले. आमची झोळी कधीही रीती ठेवली नाही. खरे सांगायचे तर मी गणितापासून लांब राहणारा माणूस. मनात गणिताची एवढी भीती बसलेली... त्या भीतीपोटी 11वी सायन्स ला गणित सोडून मानासशास्र विषय घेतला. असो...    या 14 दिवसामध्ये वैभव सरांनी संख्याज्ञान मध्ये संख्यांची निर्मिती, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, विशेष म्हणजे आभासी संख्या आणि संख्यारेषेवर अपरिमेय संख्या दाखवणे, त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या यांची अतिशय उत्कृष्टपणे फोड करून दिली. 

                   मुलांना सर्वात कठीण वाटणारा घटक म्हणजे मापणाचे रूपांतर...(सरांनी रूपांतराबद्दल खूप आत्मविश्वास दिला की तुम्ही प्रत्येकजण चुटकीसरशी रूपांतर कराल, आणि झालेही तसेच)  त्यावर वैभव सरांनी सांगितलेली क्लुप्ती खूप छान वाटली आणि भावली देखील. मनात कोणतीही शंका ठेवली नाही.आता मला नाही वाटत की मी कधी मापणाचे रूपांतर विसरेल म्हणून.   पदावली सोडवताना कोठे चुका होतात, त्यासाठी BODMAS, PEDMAS चे सखोल ज्ञान. बैजिक राशी बद्दल अत्यंत बारीक बारीक गोष्टीची माहिती अतिशय उत्तमरीत्या समजावून दिली.   असे वाटायचे की सरांना अजून ऐकतच राहावे 

  वैभव सरांमुळे गणित विषयाचा लळा लागला.. 

  विशेष म्हणजे वैभव सरांची विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ त्यांच्या बोलण्यातून प्रत्येक दिवशी जाणवली. गणितासंबंधी प्रेम, संबोध समजावून देण्याची पद्धत, हसत खेळत गणित कसे शिकवावे, गृहकार्य देऊन संबोध पक्का झाला की नाही हे तपासणे हे सर्व सरांकडून घेण्यासारखे आहे. 

  म्हणून सरांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे  💐💐💐

एवढेच नाही तर याठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते...   प्रत्येक दिवसाचे सेशन संपले की, सर हात जोडून आठवणीने सांगायचे "Stay Home & Stay Safe" 

तुमच्या कडून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आम्ही विद्यार्थ्यांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.

  आम्हाला LEARNING FROM HOME च्या माध्यमातून गणितमित्रांचा सहवास तर लाभलाच, परंतु real life मध्ये वैभव सर आणि वाल्मिक सर तुमच्या रूपाने उत्तम मित्र जोडले गेले. 

  आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार  

स्मिता प्रल्हाद पाटील,

जि.प.शाळा, अंबाठा, त्र्यंबकेश्वर

                 गणित माझा नावडता विषय. भरपूर मार्क्स मिळायचे पण कधीच आवडला नाही. स्वतःच्या मुलाला शिकवताना जाणवलं की शिकण्यापेक्षा शिकवताना जास्त त्रास होतो. आपल्याला समजलं तरी मुलांना सोपं करून सांगण अवघड. कायम लहान वर्ग शिकवायला मिळाल्यामुळे कधी गरज पण वाटली नाही. पण पदवीधर झाल्यावर वाटलं की, आपल्या अज्ञानामुळे मुलांचे नुकसान होतेय, आणि तेव्हापासून गणिताचे जे मिळेल, जिथून मिळेल ते गोळा करायला सुरुवात केली. त्यासाठी आधी पण गणित मित्रची मदत होत होती. मात्र या 14 दिवसांनी आत्मविश्वास दिला.

🎾 झूम अँप शिकायला मिळालं. Geogebra सह अनेक डिजिटल अँप आपले शिकवणं सोपं करू शकतात ही जाणीव झाली.

🎾 अत्तार सर ,अविनाश कुलकर्णी सर यांसारखे गणिताला सोपे करणारे गणिताचे विद्यार्थी जवळून अनुभवता आले. प्रेरणा मिळाली.

🎾 आपल्याकडे खूप जमा झाल की थोडं दुसऱ्यांना पण द्यावं ,सगळ्यांना समृद्ध करावं ही भावना जपणारे वैभव शिंदे सर यांच्या सोबतचे 14 दिवस फार लवकर संपले.

🎾 आभासी संख्या,फॅक्टोरिअल, पदावल्या सगळं नव्याने अनुभवायला मिळालं.

🎾 घरी राहून या 14 दिवसांचे सोने झाले, नवीन दृष्टी ,नवा उत्साह आणि गणित फार सोपं आहे ही जाणीव हीच या 14 दिवसांची कमाई !

 

दत्ता  पाटील .

जि .प प्राथ शाळा माल्हणगाव  ता.मालेगाव         

             नमस्कार,    मी तसा यापूर्वी indirectly  वाल्मिक चव्हाण सर व वैभव शिंदे सर  यांच्या गणितमित्र च्या माध्यमातून संपर्कात होतोच. पण गेल्या 13-14 दिवसापासून learning फार्म home अंतर्गत zoom meeting मध्ये या दोन अवलियांच्या व्यक्तिमत्वाचे विविध  पैलू  निदर्शनास आले. कोणताही वैयक्तिक लाभ लक्षात न घेता गणिताची  आवड सर्वांमध्ये निर्माण व्हावी यासाठी धडपड करणारी ही मंडळी. LOCKDOWN च्या काळामध्ये काय करावे हा प्रश्न आ वासून पुढे असतांना ZOOM MEETING च्या माध्यमातून गणितीय संकल्पना  अतिशय सोप्या पद्धतीने स्पष्ट करून गणिताची तसेच तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली.   वाल्मिक सर आणि वैभव सर यांनी अतिशय नियोजनबध्द व अभ्यास पूर्ण असे मार्गदर्शन करत असतांना सर्वांना समजतील, उमजतील अशा सहजसुंदर, सोप्या शब्दात,  आवश्यक त्या ठिकाणी teaching aids चा वापर  मुलांना अवघड वाटणारे संबोध अतिशय सोप्या पद्धतीने स्पष्ट करून मार्गदर्शन केले.

मला वैयक्तिक अवघड वाटणारे गुणोत्तर प्रमाण, बैजिक राशीं lcm, hcf online  workshop नंतर चुटकी  सरशी सांगता येवू लागल्या.  हे प्रशिक्षणामुळे शक्य झाले असे मला वाटते.

वाल्मिक सर आणि वैभव सर यांचे CO-ऑर्डिनेशन वाखाणण्याजोगा आहे. मला वाटते यामागे त्या दोघांची खूप मेहनत आहे. 1 तासामध्ये जे काही आपल्यासमोर मांडायचे याचे सुंदर असे नियोजन व मांडणी करण्यात त्यांचा खूप वेळ खर्ची पडत असेल यात काही शंकाच नाही. या काळात सहभाग घेणाऱ्या सर्व शिक्षक पालक तसेच विद्यार्थी यांनी शिसबद्धपणे सरांना FOLLOW  केले त्याबद्दल सर्वांचे  खूप खूप आभार. अवी कुलकर्णी सरांनी  GEOGEBRA APP ची ओळख  करून देण्याबद्दल त्यांचाही  मी आभारी  असेन. शेवटी वैभव सरांचे व वाल्मिक सर  मनापासुन खूप खूप धन्यवाद. 15 तारखेनंतरही एखादा नवीन अनुभव आम्हाला मिळेल ही अपेक्षा 🙏🙏🙏 MEET U  AGAIN !

 अभिमन बहिरम

    जि .प. शाळा पुणेगाव  ------

                               गणित मित्र  श्री. वैभव शिंदे सर यांच्या Learning From Home च्या 14 दिवसांच्या  सेशन ला हजर राहिलो. त्यात गणितातील बारकावे समजून देण्यात आले.   संख्याज्ञान, मापन, पदावली, बैजिक राशी, यांचे मुलभुत संबोध  समजून देण्यात आले. त्याच प्रमाणे learning from home ची नविन तंत्रज्ञानाची ओळख झाली. प्रत्येक सेशन खुप चांगले व नियोजन बद्ध होते. मापनातील रूपांतर करण्याचा तक्ता अप्रतिम होता. त्यांच्यामुळे सहज कोण्त्याही एककात रूपांतर करणे सोपे झाले. एकंदरीत सर्व दिवसाचे सेशन खुप छान झाले.

 

सचिन कुलकर्णी - नाशिक -----

                      माझा मुलगा कार्तिक कुलकर्णी ईयत्ता आठवीत ईंग्रजी माध्यमात शिकत आहे. मी गणित मित्रचे  पुर्ण १४ दिवसांचे Learning from home सेशन हजर राहीलो. गणितातील लसावि, मसावि, बैजिक राशी, गुणोत्तर व प्रमाण या सर्व बाबींचा वाल्मिक सरांनी अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यास शिकविला त्याचा माझ्या मुलाला खुप फायदा होणार आहे.  त्याचबरोबर माझीपण गणिताची ऊजळणी झाली. येणाऱ्या काळात Learning from home ही संकल्पना वाढीस येईल असे वाटते आणि यामुळेच गणिताची मनातील भिती, शंका या निश्चितच दुर होतील. वाल्मिक सर आणि वैभव सरांच्या या उपक्रमाला खुप प्रतिसाद मिळत आहे ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे. हा ऊपक्रम असाच पुढे कायम सुरू रहावा असे वाटते.

सरांचे मनापासून धन्यवाद.

कविता ज्ञानदेव पवार

जि.प.शाळा कनाशी ता.कळवण

                     मी Learning from  home ही 14 दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा पुर्ण केली.  लॉकडाऊन मुळे कार्यशाळा माझ्यासाठी  खुपच प्रभावी ठरली. गावाकडे असल्याने नेटवर्कमध्ये काही अडचणी आल्या त्यात दोन तीन दिवस माझे missed  झाले. ते दोन दिवस आपन खुप महत्वाचे शिकण्यापासून  मुकलो ही भावना सारखी मनात येत होती. मी घरच्याच शेतात काम करत असताना 2 ते 3 ही वेळ मागुन घ्यायची कि यावेळी मला कोणीही  काम सांगायचं नाही,आणि मी ही कार्यशाळा पूर्ण केली.  खरतर 1 ते4 चेच वर्ग असल्याने बाकी घटक काय कामाचे असं विचारलं असता मला हा विषय आवडतो आणि माझी मुलं मोठी होत आहेत त्यांना समजावण्याची वेळ आली तर आणि  मी माझी  revision घेतेय असं उत्तर दिलं. Thanks वैभव सर एक नवीन आणि कायम स्मरणात राहील असा अनुभव या लॉकडाऊन मुळे मिळाला.

 

संदीप दत्तू पावडे

जि. प.प्रा.शाळा दोडी बु//ता:- सिन्नर

                   मी learning from home अंतर्गत गणित विषयाचे ऑनलाईन मार्गदर्शन दि.२ एप्रिल पासून घेतले अतिशय सोप्या शब्दांत छोटे छोटे संबोध सकारण समजावून घेतले.या अगोदर कधीही मोठे वर्ग नसल्याने गणिताच्या बेसिक संकल्पना विस्मरणात गेल्या होत्या त्यांची छान उजळणी झाली.  शिक्षकास प्रशिक्षणाची आवश्यकता हवीच असते व त्यातूनच जुन्या संकल्पना नव्या पध्दतीने शिकायला मिळाल्या त्यातून या lock down काळात हे session झाल्याने वेळेचा सदुपयोग वाल्मिक व वैभव सरांनी गणिताच्या मूलभूत संकल्पना सोप्या शब्दात समजावून दिल्या.त्याबद्दल आपण तर खरे गणित मित्र आहातच   पण आमच्यातही गणिताची आवड निर्माण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.......

 गायत्री भोळे,

- स्व. प्रभाकर पुरूषोतम  वैशंपायन विद्यालय, कामटवाडे, नाशिक

                  मी गणित मित्रचे  पुर्ण १४ दिवसांचे Learning from home सेशन हजर राहीली. गणितातील  ,बैजिक राशी, मापन  या सर्व बाबींचा वैभव  सरांनी अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यास शिकविला त्याचा  मुलाला शिकवतांना खुप फायदा होणार आहे. . येणाऱ्या काळात Learning from home ही संकल्पना वाढीस येईल असे वाटते आणि यामुळेच गणिताची मनातील भिती, शंका या निश्चितच दुर होतील. वाल्मिक सर आणि वैभव सरांच्या या उपक्रमाला खुप प्रतिसाद मिळत आहे ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे. हा ऊपक्रम असाच पुढे कायम सुरू रहावा असे वाटते. सरांचे मनापासून धन्यवाद.

 

 वंदना जनार्दन सपकाळे,

 जि.प.शाळा जाखोरी, ता.जि.नाशिक.

                मी गणितमित्रचे दि. 2 एप्रिल पासून आजपर्यंत चे सर्व online sessions attend केले. या12दिवसांत खरोखरच खूप चांगल्याप्रकारे गणिताचे छोटे मोठे संबोध स्पष्ट झाले. हा लॉकडाऊनचा कालावधी म्हणजे गणित शिकण्याची सुसंधीच म्हणावी लागेल. माझी तशी आधीपासूनच गणिताशी गट्टी आहे आणि हा Learning from homeचा उपक्रम त्या आवडीला पोषक ठरला. याआधी मला zoom application बद्दल काही माहिती नव्हती, या नव्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे शिकायला मिळाले. या सर्व गोष्टींचे श्रेय गणितमित्र श्री वाल्मिक चव्हाण सर व श्री वैभव शिंदे सर यांना जाते. त्यांनी अजिबात कंटाळा न करता प्रत्येकाने विचारलेल्या सर्व शंकांचे निरसन केले. गणितातील काही सूत्र जी आम्ही पाठ करून शिकलो. ती सूत्रच सरांनी तयार करून दाखवली. लसावि मसावि,बैजिक राशीवर आधारित उदाहरणे तसेच गुणोत्तर व प्रमाण या घटकांचे सखोल असे मार्गदर्शन केले. Zoom meeting चे सर्व तांत्रिक साहाय्य श्री वैभव शिंदे सरांनी खूप चांगल्या प्रकारे केले. आजच्या काळात अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक क्षेत्रात गरजेचा आहे, म्हणून यातून काळासोबत चालण्याची प्रेरणा मिळाली. धन्यवाद गणितमित्र

 

संतोष राठोड,

जि .प. शाळा बागुलवस्ती (भालुर ), तालुका नांदगाव

                गणित मित्र श्री. वैभव शिंदे सर यांच्या Learning From Home च्या 14 दिवसांच्या सेशन ला हजर राहिलो. त्यात गणितातील बारकावे समजून देण्यात आले. संख्याज्ञान, त्रिकोनी, चौकोनी संख्या,  मापन पद्धती, मापनाचे रूपांतर सोपी माडनी, कालमापण सविस्तर माहिती, घड्याळ (इतिहास ) reading, comprehension, transformation, process encoding, प्रश्न निर्मिती, BODMAS, PEDMAS , पदावली, बैजिक राशी,बहूपदी Factorial यांचे मुलभुत संबोध   समजून देण्यात आले. त्याच प्रमाणे learning from home ची नविन तंत्रज्ञानाची ओळख झाली. प्रत्येक सेशन खुप चांगले व नियोजन बद्ध होते. मापनातील रूपांतर करण्याचा तक्ता अप्रतिम होता. त्यांच्यामुळे सहज कोण्त्याही एककात रूपांतर करणे सोपे झाले.एकंदरीत सर्व दिवासाचे सेशन खुप छान झाले.

                  विशेष असे की माझ्या मुलांनी ही संपूर्ण सेशन चा लाभ घेतला आणी मला अनेक प्रश्न मनात होते याची उकल झाली. या सर्व बाबी चा मला मी पालकांचा बनवलेला wtsp ग्रुप वर प्रत्येक दिवसाची माहिती पाठवली त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला.  त्याच प्रमाणे केंद्राच्या ग्रुप वर ही माहिती पाठवली सर्व शिक्षकाचा रिप्लाय चांगला मिळाला. हे सर्व शक्य झाले गणित मित्र वैभव सर  याच्या मुळेच.  जुलै 2019 ला गणित मित्र चव्हाण सर यांनी शालेय बाबी ची मिटिंग DIET  चे वरिष्ठ अधिव्याखाता साहेब याच्या समवेत मनमाड येथे आयोजित केली होती त्यात  माझी आंतरजिल्हा बदली ने जून मध्ये शाळेत हजर झालो. जुलै 2019 ला मिटिंग मुळे भेट झाली आणी गणित मित्र म्हणून नंबर save केला व  लिंक ही भरली आणी वैभव सर याच्या सारखे तज्ञ मार्गदर्शक याचे मार्गदर्शन मिळाले सर आपले खूप खूप आभारी आहे. आणी मला पुढील शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये आपल्या बरोबर काम करण्यास आवडेल. सर आपले मनापासून धन्यवाद.

 

 सुनिल वामन जाधव

जि प शाळा वडवाडी , ता दिंडोरी जि नाशिक .

                     वाल्मिक चव्हाण म्हटले की गणित हे त्यांच्यासोबत आलेच. कारण गणिताचे प्रशिक्षण असो की शिक्षण परिषद असो, ते हजर असतात. Learning from home ही संकल्पना गणित मित्र वाल्मिक चव्हाण व वैभव शिंदे यांनी आणली. सलग 12 दिवस सेशन घेऊन प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी यांना गणित मित्रच बनवले. लसावि मसावि हा घटक एवढा सोपा होता असे मला  आता वाटते आहे. संख्या, गुणोत्तर व प्रमाण हे ही घटक तेवढयाच सहजपणे समजावून त्यांनी  सांगितले. रोज प्रथम recap, मग न समजणारे प्रश्न, मग अध्यापन, मूल्यमापन, स्वाध्याय असे सर्व काही नियमित घेतले. त्यामुळे प्रत्येक घटक समजला. त्यांचा सरावही मी नियमित केला. माझ्यात एक गणितीय ऊर्जा त्यामुळे निर्माण झाली. असेच मार्गदर्शन नियमित मिळावे. तसेच कुलकर्णी सरांनीही Geogebra ह्या नवीन पद्धतीबद्दल छान मार्गदर्शन केले. Thanks to all.

 

 

 

दादाजी खैरनार (पदवीधर प्राथमिक शिक्षक ),

अनुदानित प्राथमिक  व माध्यमिक आश्रम शाळा मनखेड, ता सुरगाणा, जि नाशिक

             मित्रहो गेल्या 13/14 दिवसापासून आपणास लर्निंग फ्रॉम होम AA च्या माध्यमातून गणित मित्राचे विशेष करून ,अतिशय हुशार आणि कामसू व्यक्तीमत्व मा. श्री .वैभव  शिंदे सर व मा. श्री. वाल्मिक चव्हाण सर यांच्या अथक प्रयत्नातूनगणित विषय अतिशय सोपा करून ठेवलाय . विशेष बाब म्हणजे या कोरोना महामारीच्या वेळेत घरी बसून वेळ कसा घालवावा हेच सुचत नव्हते . पण हे दोन महामानव वेळेवर धावून आलेत .आणि हे 13/14 दिवस कसे निघून गेलेत हे समजलेच नाही. 

     पहिल्या दिवशीच आम्हाला झूम मिटिंग अँप कसे हाताळावे हे वैभव सरांनी सांगितले .आणि मग आमचा श्रीगणेशा असा सुरू झाला की दुसरा दिवस कधी येतो असे व्हायचे. गणितातील अवघड प्रकरणे जसे की नैसर्गिक संख्या, पूर्णसंख्या, पूर्णक संख्या, परिमेय संख्या, व शून्याचा संबोध, दशमान पद्धती अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले व गृहकार्यात प्रश्न दिलेत .दुसऱ्या दिवशी त्या प्रश्नांची उत्तरे व रिकॅप घेऊन असे करत करत  दुसऱ्या दिवशी त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या, त्यांचे सूत्र, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, संख्यारेषेवर संख्या दाखवणे इ.समजावून सांगितले यासाठी त्यांनी लॅपटॉपचा उपयोग केला. 3 ऱ्या दिवशी मापन , मापणातील उणिवा , CGS व MKS, FPS पद्धती सांगितल्या.

अशा प्रकारे  पुढच्या दिवशी चव्हाण सरांनी गणित विषयक अँप्स websites उपयुक्त पुस्तके इ माहिती दिली. त्यानंतर प्रमाणित एकक व अप्रमाणित एकक, घनफुट, MCFT, TMC, क्यूसेक व मापणाचे रूपांतरण हा महत्वाचा घटक समजावून सांगितला. त्यानंतर कालमापन, लिपवर्षं, सामान्य वर्ष, घटक खूप छान शिकवले. त्यानंतर मापणातील उणिवा , शाब्दिक उदाहरणातील समस्या, वस्तुमान, धारकता, लांबी, इ. घटक छान समजावून दिलेत.नंतर पदावली मध्ये BODMAS ,PEDMAS movious strip, हे घटक छान शिकवलेत. नंतरच्या दिवशी पदावलीची निर्मिती व शाब्दिक उदाहरणे बनवणे इ घटक शिकवलेत. नंतर दिनांक 13 एप्रिलला सकाळच्या सत्रात श्री अविनाश कुलकर्णी सरांनी Geogebra  विषयी खूप छान माहिती दिली. दुपारच्या सत्रात बैजिक राशीची माहिती , पद ,चल, सहगुणक, एकपदी, द्विपदी, त्रिपदी, बहुपदी व त्यांची कोटी आणि शेवटी Factorial ची माहिती दिली.

एकूणच या 12/13 दिवसात खूप अशी महत्वपूर्ण माहिती आम्हाला दिली त्या बद्दल आम्ही सर्वजण त्यांची खूपच आभारी आहोत.  धन्यवाद गणितमित्र

 

 

संदिप वेताळ,

 जि.प.शाळा-लांबबर्डी ता.नांदगाव जि. नाशिक

            मी गणित मित्रचे  पुर्ण १४ दिवसांचे Learning from home सेशन हजर राहिलो.नेटवर्क प्राब्लेममुळे काही सेशन व्यवस्थित समजून घेता आले नाही. गणितातील  ,बैजिक राशी, मापन  या सर्व बाबींचा वैभव  सरांनी अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यास शिकविला त्याचा  मुलाला शिकवतांना खुप फायदा होणार आहे. येणाऱ्या काळात Learning from home ही संकल्पना वाढीस येईल असे वाटते आणि यामुळेच गणिताची मनातील भिती, शंका या निश्चितच दुर होतील. वाल्मिक सर आणि वैभव सरांच्या या उपक्रमाला खुप प्रतिसाद मिळत आहे ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे. हा ऊपक्रम असाच पुढे कायम सुरू रहावा असे वाटते. सरांचे मनापासून धन्यवाद.

  

 मयुरी रमेश महाले

जि. प. प्राथमिक शाळा उंबरदे(प) ता.सुरगाणा

                     Learning from home ही संकल्पना किती छान आहे.  मी कधीच विचार केला नव्हता की, मला घरीबसून  सोप्या भाषेत एवढे चांगलें गणित शिकता येईल.  ती संधी मिळाली वाल्मिक सर आणि वैभव सरांमुळें सरांनी गणितामधील संकल्पना खूप छान समजावून सांगितले.  माझ्या शाळेत जोडो ब्लॉक आहेत पण त्याचा वापर कसा करावा हे मला माहित नव्हते. पण वाल्मिक सरांनी त्याचा वापर कसा केला पाहिजे हे समजून सांगितले. ह्या नंतर ही मला गणितमित्र कडून नेहमीच मार्गदर्शन मिळेल याची मला खात्री आहे. मी ह्या कार्यशाळेमध्ये जे काही शिकले ते मी माझ्या विध्यार्थ्यांना  देण्याचा प्रयत्न करेल.   ह्या workshop मध्ये मला सहभागी होण्याची संधी दिली. त्या बदल मी वाल्मिक सर आणि वैभव सर यांचे आभार मानते.

 

गजानन निवृत्तीराव देवकत्ते , प्राथ.शिक्षक 

  जि.प.केन्द्रशाळा सायगाव,  ता.येवला,जि.नाशिक 

              मी गणितमित्र Learning from home च्या काही सेशनला पुर्णवेळ उपस्थित होतो.काही सेशन मला उपस्थित राहता आले नाही. याचं शल्य कायम मनात राहील.आधीपासुनच मला गणिताची भिती होती.आणि 11 वर्षे लहान वर्गावर अध्यापन करत असल्याने थोडा नाही खुपच विसर पडला. पण वाल्मिक चव्हाण सर यांच्यासोबत याविषयी बहुतांश वेळा संवाद झाला. चव्हाण सरांनी तर वेळात वेळ काढुन सायगाव येथे तीन वेळा येऊन मला व माझ्या वर्गाला मार्गदर्शनही केले. वैभव शिंदे  सरांना मी चार वर्षापासुन फॉलो करतोय दोन्ही गणितमित्र म्हणुन अद्वितीय तर आहेतच पण उत्तम सुलभक, मार्गदर्शक आणि मित्रही आहेत. या दोघांच्या प्रेरणेने या सेशनचा भाग होता आला. फलीत म्हणजे आता मी या सेशनच्या शेवटी गणिताची भिती संपुन पुढच्या सेशनची वाट पाहतोय. वैभव सरांची प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला हात लावण्याची पध्दत व सर्व शंकांचे निरसन झाल्याशिवाय पुढे न जाने खुपच परिणामकारक व प्रभावी आहे. वैभव सर यांनी हे सेशन आणखी आधी घेतलं असतं तर मी पण गणितमित्र झालो असतो .पण देर आये दुरुस्त आये. आता मागे वळुन पाहणे नाही.  धन्यवाद वैभव सर व वाल्मिक सर. आपल्या सुलभनाने मी गणित विषयात वैभव प्राप्त करु शकतो हा विश्वास जागा झाला. मला यात आणखी प्राविण्य मिळवायचंय. पुढील सेशनच्या प्रतिक्षेसह गणितमित्र वैभव सर व वाल्मिक सरांचे खुप खुप आभार.

 

श्रीमती नयना नानाजी वाघ, उपशिक्षिका

जि.प.प्रा.शाळा खर्डे ता.देवळा जि.नाशिक

नमस्कार,

          तशी गणिताची  आणि माझी लहानपणापासून चांगली गट्टी होती पण दरम्यानच्या काळात शाळा 4थी पर्यंतच मिळाल्याने काळाच्या ओघात गणित मागे पडले. परंतु श्री चव्हाण सर आणि  श्री शिंदे सर यांच्यामुळे माझा brainwash झाला.त्यावरील सगळी जळमटे झटकली गेली एवढी उर्जा मला या zoom app  द्वारे झालेल्या online math - Learning From Home ने दिली. Online session ला मी इतकी attach झाली होती की माझ्यातला विद्यार्थी पुन्हा जसा वर्गात बसुन शिकतो आहे ही feeling होत होती .याचे सर्व श्रेय जाते ते श्री चव्हाण सर व श्री. शिंदे सर यांना .कारण ते एवढे एकरुप झालेले होते की बस..... त्यांच्यातील coordination तर  खुपच छान होते. आयुष्यातील एका वळणावर हा learning from home चा अनुभव कायमस्वरुपी  स्मरणात राहील. विशेष म्हणजे यातुन मी zoom operate कसे करायचे हे शिकली.  Thanks a lot of again GanitMitra

 

कैलास पगार, शिक्षण विस्तार अधिकारी, गणितमित्र बागलाण.

          मित्रांनो नमस्कार, गणित मित्रचे १४ दिवसांचे सेशन पुर्ण केले. Learning from home या संकल्पनेतुन  श्री. शिंदे सर व श्री चव्हाण सर यांनी गणित सोपे होणेसाठी सहज सहज संबोध क्लीअर केले. त्याला सलाम. खरेच तसा गणित हा विषय आनंद देणारा. नेहमी नाविन्य व चॅलेंजींग देणारा हा विषय. शिंदे सरांनी संख्यारेषा,बैजिक राशी,मापन,रुपांतरण,संख्या प्रकार चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. परिमेय संख्या,अपरिमेय संख्या,पुर्ण संख्या व पुर्णांक संख्या यातील फरक लक्षात  आणुन दिलेत. geogebra चा वापर याबाबतची नविन माहिती मिळाली. धन्यवाद सर .हा उपक्रम असाच सुरू रहावा.मी माझ्या दोन्ही मुलांसोबत या सेशनचा लाभ घेतला. दोघांचे मनापासून धन्यवाद.पुढील अशाच नविन उपक्रमासाठी शुभेच्छा💐💐💐

 

वर्षा पराग चौधरी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंबाळे , तालुका इगतपुरी जि नाशिक

                    विविध गणित कार्यशाळांच्या माध्यमातून श्री.  वाल्मिक चव्हाण सर व श्री.  वैभव  सर यांच्या प्रत्यक्ष सुलभनाचा मला लाभ मिळाला होता.  लॉकडाऊन च्या काळ सत्कारणी लावणारी अशी ही कार्यशाळा v2 यांनी घेतली.   गणितातील काही मुलभूत संबोध विद्यार्थ्यांपर्यंत कोणत्या पद्धतीने पोहचविता येतील.? कोणते साहित्य वापरून अमूर्त संबोध मूर्त रुपात आणता येतील.? तंत्रज्ञानाचा गणित अध्ययन अध्यापनासाठी कोठे  वापरता येतील?  असे प्रश्न मनात होतेच. इतर सुट्टया येत होत्या व जात होत्या  परंतु  काही बदल घडून येत नव्हता.  गणितमित्र च्या  माध्यमातून लिंक मिळाली.  ज्या  घटकांबाबत समस्या होत्या  त्या मांडल्या.  आणि खरोखर  लॉकडाऊन चा कालावधी सत्कारणी लागला. या कार्यशाळेच्या निमित्ताने वाल्मिक सरांच्या प्रत्येक सदस्याला संबोध क्लिअर होईपर्यंत सुलभनामुळे , संबोधांचे उपयोजन कोठे होते याबाबतच्या स्पष्टीकरणांमुळे मनातील या घटकांबाबतच्या शंकाचे निरसन झाले.

                 Zoom app पहिल्यांदा वापरत असतांना वैभव सरांच्या वेळोवेळी मिळत असलेल्या सुचनांमुळे  zoom  app वापरा बाबत आत्मविश्वास निर्माण झाला.  गणित अध्ययन अध्यापनासाठी कोणती सॉफ्टवेअर वापरता येतील  याबाबत   निश्चित दिशा मिळाली. खरोखर दोघांनींही तन मन व धनाने गणितासाठी वाहून घेतलेले 

आहे याचा अनुभव आला. धन्यवाद मानावे तितके कमीच आहेत. अविनाश कुलकर्णी सरांना विनंती त्यांनी geogebra बाबतचे मार्गदर्शन पुढे continue करावे.

 

अनिल ज्ञानदेव थोरात.

जि .प प्राथ शाळा काननवाडी (खेड) ता.इगतपुरी .

                  मी गणित मित्र चे १४ दिवसांचे Learning From home चा उपक्रम घेतला  वैभव सर आणि वाल्मिक सर यांनी अतिशय नियोजन बध्द व अभ्यास पूर्ण असे मार्गदर्शन केले . मुलांना अवघड वाटणारे संबोध अतिशय सोप्या पद्धतीने स्पष्ट करून मार्गदर्शन केले. लहान एककाचे मोठ्या एककात व मोठ्या एककाचे लहान एककात रूपांतर करणे,बैजिक राशी, पदावली, त्रिकोणी व चौकोनी संख्या चुटकी सरशी सांगता येवू लागल्या. हे सर्व यश या प्रशिक्षण चे आहे. त्यामुळे मुलांसमोर जातांना एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला व त्याच प्रमाणे मुलांची गणित विषयाची असणारी भीती निश्चित पणे दूर करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच पुढील शैक्षणिक वर्षांपासून वर्षभर  गणित विषयाचे मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. हा उपक्रम असाच वर्षभर सुरू रहावा असे मनोमन वाटते. वैभव सरांचे करावे तेवढे कौतुक कमी पडेल . सहभाग घेणाऱ्या सर्व शिक्षक पालक तसेच विद्यार्थी यांचेही खूप खूप आभार. आणि शेवटी वैभव सरांचे व वाल्मिक सर  मनापासुन खूप खूप धन्यवाद....

पुन्हा नक्की भेटू.

   श्री राहूल दिनकर खंदारे, पाटोदा, ता. येवला.

उपशिक्षक , संतोष श्रमिक माध्यमिक विद्यालय, बाभूळगाव (येवला )

                 नमस्कार सर, गणित मित्र या संकल्पनेतून दिनांक २ एप्रिल २०२० ते १४ एप्रिल २०२० हे १३ दिवसांचे online math - Learning From Home आयोजित करण्यात आले. यामध्ये गणित विषया संबंधी उत्कृष्ट व अपेक्षित अशी माहिती या गणित प्रेमींनी दिली ( श्री वाल्मिक चव्हाण सर व श्री वैभव शिंदे सर ). जसे की लसावी, मसावि, बैजिक समीकरणे, गुणोत्तर, प्रमाण अशा घटकांवर अधारित सर्व सांख्यिकीय व शाब्दिक उदाहरणे त्यांनी उत्कृष्ट रित्या समजून सांगितली. याचा फायदा निश्चितच माझ्या विद्यार्थ्यांसाठी व माझ्या भविष्यासाठी होईल, हे मी अगदी जबाबदारीपूर्वक सांगतो.  नवीन तंत्रज्ञानाचा ( Zoom App ) अगदी योग्य प्रकारे वापर करून सर्व घटकांची माहिती तुम्ही दिली. हे आधुनिक शिक्षण पद्धतीचं एक उदाहरणच म्हणता येईल..या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शैक्षणिक क्षेत्रात नक्कीच खुप मोठ्या प्रमाणात व योग्य पद्धतीने करता येईल हे तुम्ही दाखवून दिले.....

                   गणित विषयाबद्दल जर जवळीक निर्माण केली, आवड निर्माण केली, प्रेम निर्माण केलं तर गणिताचे स्वप्न नक्कीच पडतात हे तुम्ही या प्रशिक्षणा मध्ये सिद्ध केलं. श्री वाल्मिक सर व श्री वैभव सर तुमच्या बद्दल लिहण्यासाठी शब्द अपुरे आहेत, खुप महान कार्य तुम्ही हाती घेतले आहे, ते असेच करत राहा, थोरा मोठ्यांचे  आशीर्वाद तुमच्या  सोबत आहे. श्री वाल्मिक चव्हाण सर व श्री वैभव शिंदे सर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ या प्रशिक्षणासाठी दिला, त्याबद्दल तुमच्या दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद व आभार. तुमच्या या अथक परिश्रमाला खरचं मनापासून सलाम. तुमच्या भावी वाटचालीस देखील खूप खूप शुभेच्छा....🌹🌹

 

ओवी अविनाश कुलकर्णी

शाळा- महात्मा गांधी हायस्कुल,इगतपुरी  इयत्ता - ७वी   तुकडी-ब

            नमस्कार, दिनांक २ एप्रील ते १० एप्रील पर्यंतचा हा अनुभव , अविस्मरणीय होता. श्री.चव्हाण सर व शिंदे सरांनी गणिताबद्दलची  मनातली  सगळी भिती व सगळ्या शंका दुर केल्या. चव्हाण सरांनी अत्यंत सोप्या पद्धतीने गणितातील काही धडे व  सुत्र सांगुन , मनातल्या गणिता बद्दलच्या सगळ्या शंका दूर केल्या. व सर्व सहभाग्यांनीही त्याला उत्तम प्रतीसादही दिला.  लॉकडाउन मध्ये घरबसल्या गणित शिकायला मिळतय या उत्सुकतेन मुलं सहभागी झाले,तर परत गणिताची उजळणी व्हावी म्हणुन मोठ्यांनी देखील सहभाग घेतला. लसावी, मसावी, बैजिकराशी,

गुणोत्तर व प्रमाण  वाल्मिक सरांनी पक्के करुन घेतले.

  • धन्यवाद चव्हाण सर, व शिंदे सर. And all Ganitmitra team

 

अब्रार  आशरफभाई  मनियार (प्रा,शिक्षक),

शासकीय  माध्यमिक  आश्रमशाळा  रामेश्वर, तालुका देवळा (नाशिक)

                         मी सर्वप्रथम  वैभवजी शिंदे व वाल्मिकजी चव्हाण या दोन अवलियाना खुप खुप धन्यवाद  देईन  कारण गणित हा विषय  मुलांना   संबोध आकलन न झाल्यामुळे सर्वात जास्त मुले  या विषयाच्या प्रवाहापासून लांब किंवा बाजुला पडतात व लाँकडाऊन  च्या वैश्विक संकटात असताना दिवसागणिक  बातम्या, वातावरण  पाहून जी उदासिनता आली होती. ती तर पहिल्या दिवशी वैभव सरांचे झूम सेशन झाल्यानंतर   केव्हा निघुन गेली मिञांनो कळल देखील नाही.  पहिल्या दिवशी संख्याची ओळख हा घटक एवढ्या कल्पकतेने  सादर झाला की जो संभ्रम  ञिकोणी सँख्या ,चौकोणी संख्या, परिमेय /व  अपरिमेय संख्याच्या बाबतीत कायम संग्दिधता असायची,  ती चुटकीसरशी ह्या जादुगरांनी  दुर करुन दिली. खरंसागु मिञानो, वैभव व वाल्मिकजी  जी मेहनत सादरीकरणासाठी घेतात त्यासाठी लागणारे संदर्भ आणि हा घटक कसा सुलभ पद्धतीने  समजुन देता येईल  ह्याच्याकरिता तर सलाम आहे.... अनंत संख्या ही संकल्पना एक साध्या  वर्तमानपञाच्या एका पट्टिच्या साहाय्याने  अगदी सोप्या सरळ रीतीने समजून दिले व मापनात नेहमी दुर्लक्षितअसणारे डेका, हेक्टो, किलो ह्या घटकावर रुपाँतर करायची प्रकीया तर लाजवाब  होती. अगदी एक क्युब लिटर मध्ये 28;31,लिटर पाणी मावते इथपर्यत  हे संबोध स्पष्ट  करुन दिले व हे  सर्व काही सेंकदात  करता येईल हा आत्मविश्वास  सुध्दा  आमच्यात बिंबवला हे सुध्दा नमुद करणे माझे कर्तव्य  समजतो .

                 यापुढे ज्या ज्या वेळेस  मुलांना अभ्यास करु द्यायचा  की शिकु द्यायचा याचे उत्तर देखील मला ह्या लर्निग फाँर्म होम यावर मिळाले व नक्कीच  एक अदभुत अनुभव मला मिळाला समुहातील सर्वाचे खुप  खुप धन्यवाद  कारण नविन संकल्पना  नविन गोष्टी या निमित्ताने  शिकता आल्या . वैभवजी व वाल्मिकजी  या गणितमिञांना हँटस आँफ सँल्युट

 

चव्हाण प्रेरणा नानाजी,

शाळा :जि. प.प्राथमिक शाळा चोरझिरा ता. बागलाण जि. नासिक

            दिनांक 2/4 /2020 ते14/4/2020पर्यंतच्या online वर्गात मी सहभागी झाली होती. मला या कार्यशाळेतून खुप काही शिकता आले. मी इ. 1ली ते 4थी च्या वर्गांना शिकत असल्याने माझे 5वी ते10वी गणिताशी जास्त संबंध येत नव्हता पण या कार्यशाळेमुळे मला परत ते शिकता आले. आणि चव्हाण सरांच्या अध्यापन शैली खूपच आवडली.  त्याचा उपयोग मी माझ्या अध्यापनात करण्याचा प्रयत्न करेल. तसेच शिंदे सरांकडून अनेक टेक्निकल गोष्टी शिकता आल्या. Lockdownचा असाही वापर करता येईल असे वाटले नव्हते. या कार्यशाळेमुळे माझ्या ज्ञानात भर पडली. त्यामुळे अशा प्रकारच्या  कार्यशाळा कायम आयोजित करण्यात याव्यात. श्री. वाल्मिक चव्हाण व श्री. शिंदे सर यांचे मनापासून आभार व धन्यवाद.

 

कावेरी जिभाऊ शिरसाठ,

 शताब्दी इंग्लिश मिडीयम स्कुल आगासखिंड

              ⚛️ गणितमित्र श्री. वाल्मिक चव्हाण सर व श्री. वैभव शिंदे सर  यांनी आयोजित Learning From Home या १४ दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेत मी सहभागी होते.या कार्यशाळेत संख्याज्ञान,मापन, पदावली,बैजिक राशी इत्यादी घटकांचा समावेश होता.या कार्यशाळेत प्रत्येक सेशन हे अतिशय छान होते. त्याचबरोबर मापन या घटकावर आधारित तक्ता खूपच छान होता,त्यामुळे लहान एककाचे मोठ्या एककात रूपांतर करण्याची सोपी पद्धत शिकलो. धन्यवाद गणितमित्र. या कार्यशाळेमुळे आमचा १४   दिवसांच्या वेळेचा सदपयोग झाला , त्याचबरोबर सर आपण दिलेल्या ज्ञानाचा आम्हाला आमच्या दैनंदिन अध्यापनात नेहमीच उपयोग करू व विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करु.

 

विकास विलास तरटे प्राथमिक शिक्षक,

नगर परिषद शाळा क्र.7 मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक 

           ☘️वैभव सर तुमच्याकडून जेवढे घेता येईल तेवढे घेतले ,सर तुमच्या कडून जेवढे घेता येईल तेवढे घेतले , तुमच्या विचारातील कण नि कण वेचले☘️ 

                 मी  वैभव सरांच्या व वाल्मिक सरांच्या📗   Learning From Home   📗 या ऑनलाइन वर्गाला 14 दिवस पूर्ण वेळ उपस्थित होतो. सुरुवातीला ऑनलाइन लिंक(प्रि टेस्ट) भरून दिल्यानंतर मला असे वाटले नाही कि माझा या १२०० मधून माझा नंबर लागेल. आणि या वर्गासाठी  मला संधी मिळाली. हे प्रथमतः माझे भाग्य समजेल. वैभव सरांना व वाल्मीक सरांना मी नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे पाहिलेले आणि तेव्हापासून गणित मित्राच्या माध्यमातून यांच्यासोबत राहिलो.   📗Learning From Home📗   या चौदा दिवसांच्या सेशन मधून मी वैभव सरांच्या गणिताच्या समुद्राच्या मधून किमान एक बादलीभर ज्ञान घेतले.  वैभव सरांची अध्यापनाची आवड, समजून देण्याची पद्धत, गणित सोपे कसे करून शिकवावे  व प्रत्येक घटकावर सखोल मार्गदर्शन या विषयी तर सरांचे  कौतुक करावे तेवढे थोडेच. गणिताविषयी मला गोडी लागली ती ह्या दोन माणसांमुळेच. या सेशनमधून सरांनी संख्यांची ओळख, परिमेय संख्या,अपरिमेय, संख्या,त्रिकोणी,चौकोनी संख्या या मधील गोंधळ खूप छान पद्धतीने समजावून सांगितला.वर्गमुळात 2 वर्गमुळात5 संख्यारेषेवर दाखवणे या या कन्सेप्ट ही क्लिअर केल्या. मापनाच्या बाबतीत असणाऱ्या शंका, संभ्रम सर्वदूर केले.( आता मी कधीच म्हणणार नाही की 5 कीलोलीटर पाणी बादलीने नेणार.)

                BODMAS,PEDMAS या ही वापरावर मार्गदर्शन केले. प्रत्येक घटकावर गृहपाठ देऊन सराव करून घेतला. प्रत्येक दिवसाचा सेशन सुरू होण्यापूर्वी कालच्या सेशनची उजळणी वैभव सर नक्की घेत व व दररोज जो घटक घटक शिकवीत त्या घटकावर तासाच्या शेवटी किमान 5 ते 10 मिनिटं प्रत्येकाच्या शंका विचारत व शंकांचे निरसन करत.

या सेशनमधून निश्चितच आमच्यामध्ये एक गणीतविषयी आत्मविश्वास निर्माण झाला. आम्हाला गणित सोपे कसे करून शिकवावे याचे उत्तम मार्गदर्शन झाले. 🙏   धन्यवाद वैभव सर  🙏💐💐 आपले खूप खूप आभार💐💐

  विशेष म्हणजे वैभव सरांचे गणितामधले च नाही तर टेक्नॉलॉजी मधले ही ज्ञान उत्तम आहे...

 

 

कैलास बोडके,

पालक

नमस्कार गणित मित्रांनो...

         मी वाल्मीक चव्हाण सरांचा  सहावी ते दहावी दरम्यान चा  वर्गमित्र /हॉस्टेल मित्र . त्यामुळे एक वेगळच नातं  आमच्या मध्ये आहे. वाल्मीक सरांची सुरगाणा हून नाशिकला बदली झाल्यावर,  त्यांनी आवडीप्रमाणे गणिताच्या क्षेत्रात केलेली उल्लेखनीय प्रगती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. त्यांची  प्राथमिक शैक्षणिक क्षेत्राबद्दल तसेच विशेषत: गणिताबद्दल असलेली तळमळ आपण सर्वजण बघत आहोत. वेगवेगळे साहित्य उपक्रम यांचा वापर करून प्राथमिक/माध्यमिक शाळांमध्ये अतिशय छान पद्धतीने  मुलांना समजेल अशा प्रकारे  साहित्य व उपक्रमांची जोड देऊन त्यांनी  गणित हा विषय  सोपा करून /उलगडून दाखविला आहे.

                    मित्रांनो आपण सर्व जाणतो  की गणित हा विषय  आपल्या  आयुष्याशी निगडीत आहे. जन्मापासून मरणापर्यंत  गणिताचे व्यवहार हे आपल्या आयुष्याशी चिकटून असतात.  घरातील आर्थिक व्यवहार करणे विविध बिल भरणे, किराणा असो  दूधवाल्याचा हिशोब,मोबाईलची/पेट्रोलची खर्च ...अशा सर्व गोष्टी मध्ये गणित हे आपल्या  आयुष्याशी गट्टी करून असते. आपल्या शिक्षण क्रमातील  इतर विषय  जीवशास्त्र ,भौतिकशास्त्र व अन्य विषय हे  आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्यापासून दुरावतात .पण गणित मात्र  आपल्याशी कायम गट्टी करून राहतो . त्यामुळेच श्री वाल्मीक चव्हाण सर व वैभव शिंदे सर यांच्या सारख्या अभ्यासू गणित मित्रांच्या माध्यमातून आपण  या  गणित  ऑनलाईन लर्निंग  उपक्रमात एकत्र आलो.परत एकदा आपली उजळणी झाली , त्याबद्दल  या गणित मित्रांचा नक्कीच आपल्याला अभिमान आहे. मी अशा प्रकारच्या उपक्रमास  नक्कीच हजर राहिल. आणि  असेच गणित मित्र वाढवायची जबाबदारी माझी पण आहे हे मी जाणून आहे.तरी  या  उपक्रमास राज्य सरकारतर्फे जी प्रेरणा दिली जाते त्याकरता  शासकीय विभागास  शुभेच्छा .

या ONLINE LEARNING उपक्रमामुळे गणितातील आवश्यक संकल्पना दृढ होण्यास तसेच गणिताची मनातील भिती, शंका या निश्चितच दुर होतील. हा ऊपक्रम असाच पुढे कायम सुरू रहावा असे वाटते.

वाल्मिक सरांचे मनापासून धन्यवाद. 🙏🙏

- आपल्यातीलच एक गणित मित्र कैलास बोडके

 

गजानन विठ्ठलराव उदार

शाळाःजि प शाळा टाकळी विं

                        मित्रा, सर्वप्रथम तुझे व वाल्मीकचे मनःपूर्वक अभिनंदन. ऐन सुट्टीत जेव्हा सगळे आराम करतात तेव्हा तुम्ही दोघांनी गणित रुजविण्यासाठी घेतलेली ही ऑनलाईन वर्गाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. घरातील लहान पिलांमूळे आणि learning from home च डिजीटल कंटेट तयारीमूळे मी फक्त एकच सैशन उपस्थित राहू शकलो.कालमापन ह्या घटकाला मी उपस्थित होतो.कंटैटसोबतच तो पोचवण्यासाठीची तुझी धडपड अजूनही आठवतैय. really hats off. तंत्रज्ञानाचा सुरेख वापर आणि सकारात्मक देहबोली यांतून झालेल्या सर्वच कार्यशाळा दि बेस्ट. भविष्यकालीन उपाययोजनांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!

 

 वाल्मिक वाकचौरे सर

(अहमदनगर)

          खूप छान अनुभव आला. आजच्या या संकटाच्या काळात घरात बसून फार उदास वाटायला लागलं होत. पण आपल्या सारख्या बुद्धिजीवी लोकांना बुद्धीला काही खाद्य नसेल तर जमत नाही. वाल्मिक सर तुमच्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन मी लगेच माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यास ग्रुप वर मेसेज टाकला व उद्यापासून आम्ही झूम ऍप चा उपयोग करून शिकवणार आहोत. पालक देखील तयार झाले. जोशी सर यांनी सकाळी मला मार्गदर्शन केले त्या पदधतीनुसार मी काम केले. आपल्या या उपक्रमाचा माझ्या प्रमाणे इतरही अनेक बांधवांना उपयोग व्हावा म्हणून मी प्रयत्न नक्की करणार आहे.  आपल्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.....

 

श्री.अलीम जिलानी शेख,प्राथमिक पदवीधर,

 जि. प.उच्च प्राथमिक शाळा वाघलवाडा ता.उमरी जि. नांदेड 

                 आपण सर्वांना सस्नेह नमस्कार,  प्रथमतः श्री. वैभव सर, आणि वाल्मिक सर यांचे हार्दिक अभिनंदन! 

   हम शिक्षक है शिक्षा की तस्वीर बदल देंगे इन नन्हों मुन्हों का तकदीर बदल देंगे |

                 हे बिरुद काळजावर कोरून विद्यार्थी हितासाठी आजीवन कष्ट करणारे वैभव सर आणि वाल्मिक सर खरोखरच आपण दोघे आचार्य आहात .पूर्ण निष्ठेने शिक्षक बंधूभगिनीना आपण विविध गणितीय संबोध बाबत सखोल  मार्गदर्शन केलात . त्यामुळे आपण  दोघांचा मनापासून यथोचित सन्मान करतो.या कोरोना महामारीमध्ये Learning from Home या उपक्रमा अंतर्गत अंकगणित, संख्याज्ञान पासून ते पदावली पर्यंत चे संबोध उदाहरण सह , विविध कृतीतून आम्हाला स्पष्ट करून सांगितले  ही गौरवास्पद बाब आहे. आदरणीय विकास सर, वाल्मिक सर   महाराष्ट्राच्या शैक्षणिक कार्यात अखंड आणि अक्षय ऊर्जा पुरविणारे महा प्रकाश पर्व ठरावेत अशी मनोकामना करतो. या दोन्ही आदर्श व्यक्तीमत्वाच्या नियोजनबद्ध पद्धतीने हा आपला Learning from home mathematics workshop सोहळा अगदी दिमाखदार अन् शानदार पद्धतीने, खेळीमेळीने, एकमेकांच्या मतांचा आदर करून संपन्न केलात.  आपल्या दोघांचे मनस्वी हार्दिक अभिनंदन..

              आपल्या गणितीय प्रतिभेच्या आणि कल्पक ज्ञान निर्माणाच्या या सर्वोत्कृष्ठ यशाचा  मला असीम आनंद झाला आहे..!  ज्ञानाची अविरत साधना आणि अध्यापनाची अखंड आराधना माणसाला आभाळा एवढ्या उंचीवर नेऊन विलोभनीय सात्विक सन्मानाच्या ज्ञान  क्षितीजाचे दर्शन घडवून आणते... तुम्ही त्या पात्रता सिद्ध करून शिक्षक पदाची महत्ता आणि गुरुसंस्कृतीचे असाधारणत्व सोदाहरण साक्षात करून दाखवले आहे ... माणसाच्या लौकिकाची  उंची तो कोणत्या पदावर आहे यातून सिद्ध होत नाही तर त्याने केलेल्या सृजनशील अविष्कारातून साकार होते...!  

         शिक्षक कभी सामान्य नही होता ... निर्माण और सृजन उसके गोद मे जन्म लेते है।

            आर्य चाणक्य नावाच्या प्राचीन काळातील एका शिक्षकाच्या या सिद्धांताला तुम्ही प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवले आहे ..!  आपल्या या ज्ञान साधनेचे आणि त्या उंचीवरून जाऊनही अंगी असलेल्या विनम्रतेचे मी हार्दिक अभिनंदन करतो .. आणि पुढील समर्थ ज्ञान साधनेतून आणि शैक्षणिक अनुसंधानातून  राष्ट्रीय स्तरावरील एक उतुंग शैक्षणिक संशोधक म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी आपणास शुभकामना देतो ! 

 नीता विजयसिंग पाटील,

 स्वामी विवेकानंद विद्यालय ,पंचवटी

                गणित मित्रचे श्री.शिंदे सर व श्री चव्हाण सर यांनी  learning from home या संकल्पनेतून  गणितातील अनेक  संबोध सहज व सोप्या पद्धतीने, आनंददायी रितीने 14 दिवसांच्या सेशनमधून आमच्यापर्यत पोहोचवले. त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या यात होत असलेला संभ्रम दूर झाला. मापन पद्धतीतील रूपांतरणअतिशय उत्तम रितीने स्पष्ट केले. BODMAS,PEDMAS विविध उदाहरणे देत समजावला.झालेल्या भागावर रोज गृहकार्य देऊन झालेला भाग पक्का करून घेतला.वेळेचा सदूपयोग या गणितमित्रांनी आमचा करून घेतला .याबद्दल एका गणितमित्राकडून, श्री शिंदे सर व श्री.चव्हाण सर या गणित मित्रांचे आभार

वंदना विश्राम देवरे.

KGBV -पेठ.

         मी Learning from home.अंतर्गत गणित विषयाचे आँनलाइन मार्गदर्शन दि. 2 एप्रिल पासून घेतले. अगदी सोप्या पद्धतीने श्री .वाल्मिक चव्हाण सरांनी स्पष्ट केले. गणिताच्या मूलभूत संकल्पनांची चांगल्या प्रकारे उजळणी झाली.या lock down काळात हे प्रशिक्षण आम्हाला खूप मार्गढर्शक ठरले. श्री वाल्मिक चव्हाण, सरांनीअजिबात कंटाळा न करता प्रत्येकाने विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले. धन्यवाद.

 

 महेंद्र बाबुराव आंबुलगेकर,

जि प प्रा शाळा गोकुळपाडा, केंद्र अलियाबाद ता बागलाण जि नाशिक

                  सर्व प्रथम मी गणितमित्र वैभव शिंदे सर व चव्हाण सर यांना धन्यवाद देतो, ज्यावेळी गणितमित्र वर पोस्ट आली की, आपण 2 एप्रिल ते 14 एप्रिल  पर्यंत गणित विषयावर  Learning from Home च्या माध्यमातून गणितातील काही घटक शिकणार आहोत तर घटक निवडायला सांगण्यात आले.  त्यात मी सर्वच घटक निवडले कारण निष्ठा प्रशिक्षण पासुन वैभव सरांची गणित शिकवण्याची पद्धत खूप आवडली होती, Learning from Home  या संकल्पनेतुन 14 दिवसाचे सेशन मी पुर्ण केले. त्यातील एक सेशन जे 11 ते12 यावेळेत  technical चे होते ते तांत्रिक अडचणींमुळे भेटले नाही . तरीपण बाकीचे गणित विषयावर झालेले पुर्ण सेशन मी होतो, यामधील संख्याज्ञान, त्रिकोणी संख्या, चौकोणी संख्या पासून ते बहुपदी factorial पर्यंत चा सर्व संबोध जवळपास समजले आणि त्याचा वापर माझ्या अध्यापणात 100%होईल . याचप्रमाणे मला zoom App  या नवीन तंत्रज्ञानाची ओळख झाली, तसेच वैभव सरांची जी अध्यापन करण्याची पद्धत आहे ती खूपच छान आहे, हे 14 दिवस कधी संपत आले समजले सुद्धा नाही पण या दिवसात गणितातील संबोध एकदम स्पष्ट समजले.

                     प्रत्येक घटकाची मांडणी व सादरीकरण खूप छान होते, सर, आपण  या14 दिवसांत जी गणितरूपी शिदोरी दिलात ती नक्कीच मला अध्यापणात खुप दिवस पुरेल आणि या शिदोरीचा गुणाकार करून मी माझ्या संपूर्ण शिक्षकी पेशात तिचा उपयोग करील, अजुन येथून पुढे मी तुमच्या या गणित मित्र या चळवळीत नेहमीच राहील.  शेवटी तुमचे खूप खूप आभार व धन्यवाद

 

बाबाराव ज्ञानेश्वर कदम

 जि. प. प्रा. शाळा चिकाडी ता. पेठ     

        🖌️गे ल्या  अनेक दिवसापासून गणितमित्राच्या माध्यमातून   श्री. वैभव सर आणि वाल्मिक सर    ही जोडी   गणितविषयक विविध घटकावर आधारीत माहिती अतिशय  सोप्या भाषेत  आम्हा  शिक्षक, विद्यार्थी,  पालकांपर्यंत पोहचवत आहेत. त्यांचे  हे कार्य  खूप  मोलाचे आहे. सध्याच्या  परिस्थितीत    learning  फ्रॉम home   च्या  माध्यमातून संख्याची ओळख, मापनाचे रूपांतरण, पदावली, बैजिकराशी संबंधी आपण केलेले  मार्गदर्शन खूपच मोलाचे आहे. दुसऱ्याला  समजेल अशा भाषेत  विविध  उदाहरणांच्या  साहाय्याने गणितातील  संबोध, संकल्पना स्पष्ट केल्यामुळे त्या  चांगल्या प्रकारे समजतात.                                                                          

     🖌️ आम्हाला पडलेले प्रश्न, शंका ह्या  कितीही लहान असल्या तरी   तुम्ही  तेवढ्याच आपुलकीने प्रश्नाची समर्पक आणि सोप्या  भाषेत उत्तरे देतात. शिवाय  दुसऱ्याचे उत्तर ऐकून हे चूक आहे, हे असे नाही असे न म्हणता ते उत्तर  स्वीकारून  त्यात  सुधारणा करण्याची  आपली जी पद्धत  आहे  ती खूप छान आहे  . त्यामुळे  प्रश्न , शंका  विचारताना  संकोच  वाटत नाही आणि आपण बिनधास्त पणे  प्रश्न  विचारतो.               

       🖌️  आपण सांगितलेले मापनाचे रूपांतर करण्याची पद्धत तर खूप सोपी, सुलभ आहे. या अगोदर मापनाच्या परिमाणामध्ये लहान मोठे परिमाण किंवा  रूपांतर  करताना  खूप गोंधळ व्हायचा. निश्चितच  तो आता होणार  नाही.  काय शिकवायचं आणि का शिकवायचं हे सोपं आहे.  पण कसं शिकवायचं हे उमगले की अध्यापन करणे सुलभ होते. गणितमित्र च्या  माध्यमातून आपण राबवत असलेल्या उपक्रमातून, कार्यशाळेतून अध्यापन कार्यासाठी  आम्हाला  आपले सहकार्य लाभत आले आहे आणि येथून पुढेही लाभत राहील अशी अपेक्षा करतो.                                               आपणास खूप खूप धन्यवाद  .                                                                   


 

bottom of page