एका गावामध्ये एक आजी व तिची नात मंदा राहत होती. मंदा चपळ होती पण ती काही गोष्टी पटकन विसरायची.
तिच्या शाळेमध्ये परीक्षा सुरू झाल्या होत्या. त्या परीक्षांमध्ये तिला गणित विषयाची खूप खूप चिंता वाटू लागली.
"आजी, गणित एवढे कठीण का आहे?" मंदा आजीच्या जवळ बसून विचारले.
आजी आपल्या सुरकुत्या आलेल्या चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली," अगं मंदा, गणित हा खूप सोपा विषय आहे. गणितात एक जादू आहे. गणित आपल्या अवतीभोवती असते."
मंदा थोडी संभ्रमित झाली. "जादू ?"
"होय, गणिताने आपले जीवन खूप सोपे होते. गणित आपल्या जीवनात एक जादूच्या छडीप्रमाणे आहे." आजी म्हणाली.
"आपल्या दिवसभरातील अनेक गोष्टींना समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी गणिताचा वापर होतो."
मंदाला यावर विश्वास बसत नव्हता. मग आजीने तिला अनेक उदाहरणं दिली.
"आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा घड्याळ या गणितातील एका महत्त्वाच्या घटकाचा आपण वापर करतो. रिक्षावाल्या दादाला किती रुपये द्यायचे हे सुद्धा आपण गणितानेच ठरवतो की नाही?"
मंदाने विचार केला, "होय, पण परीक्षेत तर मला संख्या व त्याच्यावरील क्रिया जमतच नाही."
"तेव्हा आता आपण खेळ खेळूया," आजी म्हणाली.
"तू सकाळपासून रात्रीपर्यंत काय करते ते मला सांग आणि त्यात गणित कोठे वापरतेस ते पाहू."
मंदा तयार झाली.
"सकाळी मी ७ वाजल्यावर उठते," मंदा म्हणाली.
"बरं, उठल्यावर किती मिनिटांत तू तयार होतेस?" आजीने विचारले.
"अर्धा तास फ्रेश व्हायला, पंधरा मिनिटे नाश्ता करायला व पंधरा मिनिटे शाळेची तयारी करायला लागतात!"
"मग तुझ्या शाळेची बस किती वाजता येते?" आजी म्हणाली. "आठ वाजता" मंदा म्हणाली.
आजीने मंदा कडून पाठीव खडू मागवला खडूने पाठीवर लिहायला सुरुवात केली.
" तू सात वाजता उठतेस. त्यानंतर अर्धा तास फ्रेश व्हायला, पंधरा मिनिटे नाश्ता व पंधरा मिनिटे तयारी एकूण एक तास तुला आवरायला लागतो. सकाळच्या सात वाजेनंतर एक तास तुला आवरायला लागतो. म्हणजेच सात अधिक एक बरोबर आठ वाजतात.
तुझी बस बरोबर आठ वाजता येते."
मंदा आश्चर्यचकित झाली. तिने कालमापन या गटातील तासिकांची बेरीज केली. यात तिला कालमापन व बेरीज या दोन्ही क्रियांचा वापर केल्याचे जाणवल्यावर ती स्वतः आश्चर्यचकित झाली.
आजीने मंदाला एक आव्हान दिले यामध्ये उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणकोणत्या गोष्टींमध्ये गणिती क्रिया येतात याची तिला नोंद घ्यायला लावली.
सकाळी शाळेत जाताना रिक्षावाल्याला दादाला तिने पैसे दिले यात पैसे मोजण्याची क्रिया आली. वर्गात पोहोचल्यावर तिच्या किती मैत्रिणी शाळेत आल्यात? यामध्ये तिच्या मैत्रिणींची संख्या मोजली. शाळेत प्रत्येक तास किती मिनिटाचा होतो? याची तिने नोंद घेतली.
घरी जिना चढताना जिन्याला किती पायऱ्या आहेत? याची उत्सुकता लागून तिने पायऱ्याची संख्या मोजली. यात तिला गणनक्रिया आली
ती आजी सोबत बाजारात गेली. आजीने मंदाकडे पैसे दिले व प्रत्येक वेळेस मंदाला दुकानदारास किंवा भाजीवाल्यास पैसे द्यायला लावले. एकूण पैशातून वापस किती पैसे घ्यायचे ? याबाबत मंदालाच क्रिया करायला लावल्यात.
घरी येऊन मंदाने आजीला आज गणिताचा वापर कुठेकुठे केला? ते सर्व काही सांगितले. आजी खुश झाली.
"पाहतेस मंदा, गणित सर्वत्र आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी गणित नेहमी मदत करते."
रात्री झोपताना, मंदा गणिताचा विचार करत होती. आज तिला त्या नवीन जगाचा अनुभव आला होता.
पुढच्या दिवशी परीक्षा होती. पण आता ती घाबरत नव्हती. तिला माहीत होते की, आजीने सांगितल्याप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनात गणिती कोठे वापरली जाते, ते समजून घेतल्यास गणित कठीण वाटणार नाही.
परीक्षेत तिने सर्व गणिती क्रिया अचूक केल्यात.सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवले.
परीक्षेनंतर ती खूप आनंदात होती. त्या दिवसापासून, तिने कोणत्याही गोष्टीला कठीण मानले नाही. आजीने शिकवलेल्या गणिताच्या जादूच्या छडीचा वापर ते दैनंदिन जीवनात करू लागली.
एवढेच नाही, तर मंदाने इतरांना सुद्धा या गणिताच्या जादूच्या छडीचा वापर करायला शिकवले. दैनंदिन जीवनात प्रत्येक ठिकाणी गणित कुठे दिसते? हे इतरांना चौकसपणे पाहायला शिकवले.
वर्गात ती मित्रांना गोष्टी सांगत असे की, दैनंदिन जीवनात कितीतरी वेळा आपण अप्रत्यक्षरीत्या गणितीचा वापर करतो. त्यांनाही ते आवडत आणि त्यांचा गणितीबद्दलचा दृष्टिकोनही बदलत होता.
दिवसा मागून दिवस जात होते त्यांच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमाच्या उत्सवासाठी वर्गाची सुंदर सजावट बनवण्याची जबाबदारी मंदावर आली. परंतु, वर्गात किती मुले आहेत त्यानुसार ते किती साहित्य खरेदी करायचे, त्यापासून किती सजावट बनवता येतील याचा अंदाज येत नव्हता. तेव्हा मंदाने त्या सर्वांना मदत केली.
"आपण किती फुगे वापरू इच्छितो?" ती विचारले.
"४५ फुगे." त्यांनी उत्तर दिले.
"आणि वर्गात किती मुले आहेत?"
"३०"
"मग प्रत्येक मुलाला किती फुगे मिळतील?" मंदाने इतरांना लिहिण्यास सांगितले.
त्यांनी सर्वजण लिहिले, "४५ / ३० = १.५"
पण त्यांना फक्त पूर्ण फुगेच हवे होते. मग मंदाने एक उपाय सुचवला.
"१.५ म्हणजे एका मुलाला एक फुगा आणि उरलेला ०.५ म्हणजे अर्धा फुगा मिळेल. तर आपण ३० मुलांना प्रत्येकास एक फुगा देऊ आणि उरलेले अर्धे फुगे प्रत्येकासोबत जोडू."
त्यांना हा विचार आवडला. त्यांनी ४४ फुगे विकत घेतले आणि प्रत्येकास एक पूर्ण आणि अर्धा फुगा दिला. त्यांनी याच गणितीचा वापर करून इतर सजावटीचे साहित्य सुद्धा मोजले आणि खरेदी केले.
वार्षिक उत्सवाच्या दिवशी त्यांच्या वर्गाने बनवलेली सजावट सर्वात उत्कृष्ट होती. त्यादिवशी सर्व मित्रांनी मंदाला धन्यवाद दिला. ती खूप आनंदित होती. तिने हे सिद्ध केले की, गणिती कधीही कठीण नसते, ती केवळ समजून घेण्याची आणि सराव करण्याची गोष्ट आहे.
मंदाने सर्वांना दाखवले की, गणित हे दैनंदिन जीवनातली जादूची छडी सारखे महत्वपूर्ण आहे. ही जादू आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी आणि जगाची समज वाढवण्यासाठी मदत करते. आणि थोडासा सराव केला तर तुम्हीही ही जादू शिकू शकता!
Moral: गणित हे दैनंदिन जीवनात सर्वत्र आढळते. आपल्या समस्या सोडवण्यासाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी ती उपयुक्त असते. गणित कठीण नाही, ती समजून घेण्याची आणि सराव करण्याची गोष्ट आहे. म्हणूनच, गणिताला घाबरू नका आणि त्याच्या जादूचा अनुभव घ्या!
Comments